निता अंबानी यांनी व्हाइट हाऊसमध्ये नेसलेली साडी तयार करण्यासाठी लागला एक महिना, किंमत किती माहितीये का?

निता अंबानी यांनी सोनेरी रंगाची बनारसी रेशमी साडी नेसली होती. विशेष म्हणजे या साडीसाठी कामगारांनी एक महिना मेहनत घेतली आहे.   

| Jun 25, 2023, 11:59 AM IST

निता अंबानी यांनी सोनेरी रंगाची बनारसी रेशमी साडी नेसली होती. विशेष म्हणजे या साडीसाठी कामगारांनी एक महिना मेहनत घेतली आहे. 

 

1/9

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात त्यांच्या आदरार्थ डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. या डिनरसाठी जगातील काही प्रसिद्ध लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये भारतीय उद्योजक मुकेश अंबानी पत्नी निता अंबानी यांच्यासह सहभागी झाले होते.  

2/9

निता अंबानी यावेळी नेहमीप्रमाणे फार सुंदर दिसत होत्या. भारतीय पोषाखात असल्याने त्यांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.   

3/9

Nita Ambani Saree at White House

निता अंबानी यांनी साडी नेसत यावेळी भारतीय परंपरा, संस्कृतीचं प्रदर्शन केलं.   

4/9

Nita Ambani Saree at White House

निता अंबानी यांनी सोनेरी रंगाची बनारसी रेशमी साडी नेसली होती. विशेष म्हणजे या साडीसाठी कामगारांनी एक महिना मेहनत घेतली आहे.   

5/9

Nita Ambani Saree at White House

ही साडी रिलायन्स फाऊंडेशनच्या स्वदेश प्रदर्शनात तयार करण्यात आली होती जी भारताचीय कापडाच्या विशाल आणि सूक्ष्म कारागिरीचे प्रदर्शन करते.  

6/9

Nita Ambani Saree at White House

निता अंबानी साडीवर दागिन्यांसह गजराही घातला असल्याने त्यांचं सौंदर्य उठून दिसत होतं.   

7/9

Nita Ambani Saree at White House

दरम्यान, या साडीची किंमत किती आहे हे मात्र अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. पण ही किंमत लाखोंमध्ये असेल हे नक्की.   

8/9

Nita Ambani Saree at White House

याआधी निता अंबानी यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी आयोजित केलेल्या डिनरच्या कार्यक्रमालाही गुलाबी रंगाची साडी नेसली होती. या साडीसाठी कामगार 6 महिने मेहनत घेत होते.   

9/9

Nita Ambani Saree at White House

या साडीची किंमत 1 लाख 40 हजार इतकी होती.