अस्थमावर मात करून या भारतीय गिर्यारोहकाने 7 पर्वत केले सर !

Jul 08, 2018, 16:25 PM IST
1/6

Satyarup Siddhanta

Satyarup Siddhanta

एकेकाळी अस्थमाच्या त्रासामुळे  काही पावलं चालली तर थकणारे सत्यरूप सिद्धांंत यांंनी नवा विक्रम रचला आहे. जगातील सात पर्वतांवर त्यांंनी तिरंगा फडकावला आहे. सत्यरूप अशी कामगिरी करणारे पाचवे गिर्यारोहक आहेत. दक्षिण ध्रुवावर 111 किलोमीटरचं अंतर त्यांनी अवघ्या सहा दिवसांंमध्ये कापले. अंटार्कटिकामध्ये राष्ट्रगीताची धून वाजवणारे ते पहिले भारतीय आहेत. 

2/6

Satyarup Siddhanta

Satyarup Siddhanta

सत्यरूप यांंनी सांंगितल्यानुसार, " मी मोठी स्वप्न पाहतो. त्याचा पाठलाग करतो, ही स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मेहनतही करतो. प्रतिकूल परिस्थितीमध्येही मी स्वप्नांंचा पाठलाग करतो." 

3/6

Satyarup Siddhanta

Satyarup Siddhanta

सत्यरूप यांंनी माऊंट एव्हरेस्टसोबतच जगातील सात उंच पर्वतही सर करून त्यावर झेंंडा फडकवला.   

4/6

Satyarup Siddhanta

Satyarup Siddhanta

सत्यरूप सध्या ज्वालामुखी पर्वतावर चढाई करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. जानेवारी 2019मध्ये 35 वर्षीय सत्यरूप प्रत्येक खंडातील ज्वालामुखीच्या पर्वतांवर झेंडा फडकवणार आहेत. असा विक्रम करणारे ते सगळयात लहान गिर्यारोहक आहेत.  

5/6

Satyarup Siddhanta

Satyarup Siddhanta

यापूर्वी नोव्हेंबर 2015 मध्ये  बांग्लादेशच्या वासिया नजरीनने हा शिखर पार केला होता. (फोटो साभार : satyarup siddhanta/Facebook)

6/6

Satyarup Siddhanta

Satyarup Siddhanta

सत्यरूपने 2017 साली अंटार्कटिकामधील माऊंट विन्सन मैसिफ सर केला होता. जगातील सर्वात उंचावर असणार्‍या या ठिकाणाला सर करून सत्यरूप यांनी ग्रॅन्डस्लॅम जिंकलं आहे. अंटार्कटिका आणि चिली येथील शिखर पार करण्यासाठी ते 30 नोव्हेंंबरला रवाना झाले होते.