First Salary आल्यावर फोलो करा या टीप्स, बचतीची चिंताच होईल दूर

Saving Tips: 2023 वर्ष हे लवकरच सुरू होतं आहे. नवीन वर्ष सुरू झालं की आपण आपल्या बचतीकडेही सकारात्मकतेने पाहायला लागतो. यंदा पुढील वर्षी मंदीचं (Global Recession) वातावरण आहे त्यामुळे आपल्या सर्वांनाच आपल्या बचतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. 

Dec 24, 2022, 14:03 PM IST

Saving Tips: 2023 वर्ष हे लवकरच सुरू होतं आहे. नवीन वर्ष सुरू झालं की आपण आपल्या बचतीकडेही सकारात्मकतेने पाहायला लागतो. यंदा पुढील वर्षी मंदीचं (Global Recession) वातावरण आहे त्यामुळे आपल्या सर्वांनाच आपल्या बचतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. सध्याचा काळ थोडासा बिकट आहे असंही म्हणता येईल त्यामुळे आपल्याला आपले खर्च कमी (Expenses) करावे लागणार आहेत आणि आपली बचतही जास्त प्रमाणात वाढवावी लागणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांनाच आता आपल्या बुद्धीचा वापर करत आपल्या मिळणाऱ्या पगाराचा वापर आपण कसा करू घेऊ शकतो यावर काम करावे लागणार आहे. तेव्हा त्यासाठीचे प्रयत्न आपल्या सर्वांनाच सुरू करावे लागणार आहेत, तुम्ही यासाठी नक्कीच काही तरी योजना आखत असाल परंतु तुमचं काम आम्ही जरा हलकं करतोय. तेव्हा जाणून घ्या तुम्ही तुमची सॅलरीतून पैसे कसे बचत करू शकता. 

1/5

First Salary आल्यावर फोलो करा या टीप्स, बचतीची चिंताच होईल दूर

saving tips for the year 2023 know how to save money from your salary

लोकांना अनेकदा आपल्या पगारातून किती बचत करावी हे कळतं नाही त्यामुळे आपल्याला कायमच असा प्रश्न पडतो की आपण आपले पैसे कुठे आणि कसे साठवावे. लोकं अनेकदा आपले पैसे गुतंवण्याचा विचार करत असतात. त्यामुळे अशावेळी ते आपला खर्च कमी करून पैसे साठवण्याच्या ऐवजी दीर्घ काळासाठी विचार करत आपले पैसे गुंतवण्याचा विचार करतात. परंतु याहीपेक्षा पगार आल्यानंतर तुमच्या महिन्याला काही रक्कम साठवू शकता. तेव्हा जाणून घेऊया काही सेव्हिंग टीप्स. 

2/5

First Salary आल्यावर फोलो करा या टीप्स, बचतीची चिंताच होईल दूर

saving tips for the year 2023 know how to save money from your salary

अनेक जणांच्या अशा तक्रारी असतात की पगार येतो आणि जातो. त्यातून काहीच सेव्ह करता येत नाही. त्यांना पहिले त्यांना त्यांचे महिन्याचे जे काही ठरलेले खर्च आहेत ते भागवायचे असतात. त्यामुळे त्याच्याकडे सेव्ह करण्याजोगी फारशी काही रक्कम राहतही नाही. त्यांना महिन्याच्या शेवटीही बचत करणं मुश्किल जात. 

3/5

First Salary आल्यावर फोलो करा या टीप्स, बचतीची चिंताच होईल दूर

saving tips for the year 2023 know how to save money from your salary

बचत ही अशी एक गोष्ट आहे जी आपण आपल्या खर्चातून वगळतो. भविष्यासाठी आपण हा पैसा साठवून ठेवतं असतो. आपल्या पगारातून पैसा आला की त्यातला काही भाग हा साठवून ठेवा तो लगेचच खर्च करू नका. त्या रकमेकडे एमर्जन्सीसाठी ठेवलेला पैसा म्हणून पाहा. अशा उद्देशाने पैसे साठवायला सुरूवात केलीत तर तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. 

4/5

First Salary आल्यावर फोलो करा या टीप्स, बचतीची चिंताच होईल दूर

saving tips for the year 2023 know how to save money from your salary

पैशांची बचत करण्यासाठी तुमची विशेष उद्दिष्टे ठरवा आणि त्यानुसार पैसे साठवायला सुरूवात करा. तुमच्या मनात ही एक गोष्ट पक्की ठेवा की पैशाची बचत करून त्याचा उपयोग अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जाऊ शकतो. तेव्हा त्यानुसार प्लॅनिंग करा. तुम्हाला कोणती लक्झरीयस गोष्ट खरेदी करावी वाटतं असेल तर ती खरेदी करण्यासाठी काही वेळ बाजूला काढून ठेवा. 

5/5

First Salary आल्यावर फोलो करा या टीप्स, बचतीची चिंताच होईल दूर

saving tips for the year 2023 know how to save money from your salary

तुमचे वाचवलेले पैसे घर, कार, लग्न किंवा आजारासाठी उपचार अशा महत्त्वाच्या गोष्टींकरिता वापरले जाऊ शकतात याचा विचार ठेवा. पगाराच्या किमान 10-15% बचत करणे आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही दरमहा हजारो रुपयांची बचत करू शकाल. पगार येताच त्याच्यातला काही भाग बाजूला काढून ठेवा. दर महिन्याला बचत करायची सवय लावलीत तर रक्कम वाचू शकते.