SBI देत आहे विशेष सवलत, शॉपिंगवर मिळवा हजारो रुपयांची सूट

मुंबई : एसबीआय (SBI) ने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर  (Special offer) आणली आहे. या ऑफरमध्ये आपण शॉपिंगसाठी हजारो रुपये वाचवू शकता. औषधापासून ते हेल्थसंबंधी  Wellnessचे काही ब्रॅन्डवरही एसबीआय विशेष सवलत देत आहे. या स्पेशल ऑफरचा लाभ घेण्यासाठी YONO  अॅपमधून पेमेंट करणे आवश्यक आहे. आणि त्यासह प्रोमो कोड  (Promo Code) देखील टाकणे आवश्यक आहे.  

| Mar 13, 2021, 13:33 PM IST
1/5

गारमेंट्सचा प्रसिद्ध ब्रॅन्ड flyingmachineवरुन आपण शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही YONO अॅपच्या माध्यमातून पेमेंट करावे लागेल. कमीतकमी 1600 रुपयांच्या शॉपिंगवर 1000ची सूट मिळेल.

2/5

गिफ्ट रिटेलर कंपनीच्या  fernsnpetalsवरुन शॉपिंग केले तर पेमेंट योनो अॅपवरुन केल्यानंतर SBI सवलत देत आहे. कमीतकमी 500 रुपयांच्या वस्तू खरेदी केल्यावर 15 टक्के सूट मिळेल. त्याकरिता आपल्याला प्रोमो कोड RUPAY15 हा टाकावा लागेल.

3/5

ऑनलाईन Consultation अॅप DocsApp वरुन Appointmentची रक्कम देण्यासाठी YONO अॅपचा वापर केला तर 125 रुपयांची सवलत मिळेल. यासाठी तुम्हाला प्रोमो कोड RUPAYचा वापर करावा लागेल.  

4/5

हेल्थ प्रॉडक्ट बनवणारी कंपनी  Healthkartकडून खरेदीचे पेमेंट करण्यासाठी YONO अॅपचा वापर केल्यास तुम्हाला 10 टक्के जास्तीची सूट मिळेल. यासाठी तुम्हाला प्रोमो कोड RUPAYHKचा वापर करावा लागेल.

5/5

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटरवर हॅंडलवर या विशेष ऑफरची माहिती दिली आहे.  अधिक माहितीसाठी rupay.co.in ला भेट देऊ शकता.