नवविवाहित जोडप्यांमध्ये असते परफॉर्मन्सची चिंता, 'अशी' करा दूर

Sexual Performance Anxiety: जर तुम्ही नवविवाहित असाल किंवा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असाल, तर हे लैंगिक कार्यक्षमतेची चिंता भेडसावू शकते. ज्यामुळे तुमच्या नात्यात असंतोष आणि तणाव निर्माण होऊ शकतो.

Nov 26, 2023, 10:54 AM IST

Sexual Performance: अनेकांना आपल्याला परफॉर्मन्स एन्झायटी झालीय, हेच लक्षात येत नाही. ही समस्या कशी ओळखायची? यावर कशी मात करायची? 

1/10

नवविवाहित जोडप्यांमध्ये असते परफॉर्मन्सची चिंता, 'अशी' करा दूर

Sexual Performance Anxiety Health Tips For Newly married couples Marathi News

Sexual Performance: परफॉर्मन्स एन्झायटी ही समस्या अनेकांना भेडसावते.  विशेषत: नवीन नातेसंबंधात आलेल्या जोडप्यांना या सुरुवातीला या समस्येतून जावे लागते. अंथरुणावर असो किंवा व्यावसायिक जीवनात अपेक्षेनुसार जगू न शकण्याची भीती आत्मविश्वास कमी करू शकते. यामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतात.

2/10

परिपूर्ण नाते

Sexual Performance Anxiety Health Tips For Newly married couples Marathi News

केवळ आत्मविश्वास वाढवल्याने या समस्येवर मात करता येत नाही. तर स्वतःशी आणि आपल्या जोडीदाराशी सकारात्मक आणि परिपूर्ण नाते निर्माण करणेदेखील महत्वाचे असते. 

3/10

कशी मात करायची

Sexual Performance Anxiety Health Tips For Newly married couples Marathi News

अनेकांना आपल्याला परफॉर्मन्स एन्झायटी झालीय, हेच लक्षात येत नाही. ही समस्या कशी ओळखायची? यावर कशी मात करायची? याबद्दल जाणून घेऊया. 

4/10

लक्षणे

Sexual Performance Anxiety Health Tips For Newly married couples Marathi News

परफॉर्मन्सनची चिंता लोकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करू शकते. ही समस्या झाल्यास सतत भीती वाटणे आणि तळहातांचा घाम येणे, अशी लक्षणे आढळतात. काहीवेळा ही लक्षणे अत्यंत तीव्र चिंतेच्या स्वरूपात म्हणजेच पॅनीक अटॅकच्या स्वरूपातही दिसू शकतात. 

5/10

नात्यात असंतोष, तणाव

Sexual Performance Anxiety Health Tips For Newly married couples Marathi News

जर तुम्ही नवविवाहित असाल किंवा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असाल, तर हे लैंगिक कार्यक्षमतेची चिंता भेडसावू शकते. ज्यामुळे तुमच्या नात्यात असंतोष आणि तणाव निर्माण होऊ शकतो.

6/10

परफॉर्मन्सची चिंता

Sexual Performance Anxiety Health Tips For Newly married couples Marathi News

मानसोपचारतज्ज्ञ नातेसंबंध तज्ज्ञ रुची रूह यांनी यासंदर्भात हेल्थ शॉट्सला महत्वाची माहिती दिली. त्यानुसार, ज्याला अनेकदा सेक्शुअल परफॉ्मन्स एन्झायटी म्हणून ओळखले जाते, ही एक मानसिक स्थिती आहे. ज्यामध्ये सेक्शुअल परफॉर्मन्स खराब होण्याची भीती असते. याचा परिणाम कोणावरही होऊ शकतो. त्यामुळे समस्या ओळखणे गरजेचे असते, असे त्या सांगतात. रोमँटिक संबंधांमध्ये परफॉर्मन्सच्या चिंतेवर मात कशी करावी याबद्दल रुची रूह यांनी महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया. 

7/10

गप्पा मारायला सुरुवात करा

Sexual Performance Anxiety Health Tips For Newly married couples Marathi News

कोणत्याही नात्यात एकमेकांना समजून घेऊन आणि बोलून प्रश्न सुटतात. परंतु लैंगिक संबंधातील भावना आणि चिंतेबद्दल उघडपणे बोलण्यासाठी, तुमच्यात तसे बॉंडींग असणे गरजेचे असते. वेळोवेळी एकमेकांना समजून घेणे आणि प्रोत्साहन देणे महत्वाचे असते. चिंतेवर खुलेपणाने चर्चा केल्याने चांगली किंवा आणखी चांगली कामगिरी करण्याचा दबाव कमी होऊ शकतो. तसेच यासोबत सखोल भावनिक संबंध विकसित होऊ शकतो.

8/10

अपेक्षा बाजुला ठेवा

Sexual Performance Anxiety Health Tips For Newly married couples Marathi News

सेक्शुअल परफॉर्मन्ससाठी तुमच्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या थोडावेळ बाजुला ठेवा. केवळ शारीरिक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, भावनिक जवळीक, कनेक्शन आणि आनंद यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे.असे केल्यास मनःशांती मिळते. इंटिमसी हा तुमच्या दोघांसाठी एक अनुभव आहे. तुम्ही विशिष्ट स्तरावर कामगिरी करायलाच हवी, असा दबाव स्वत:वर आणू नका.

9/10

एकावेळी अनेक प्रयोग करा

Sexual Performance Anxiety Health Tips For Newly married couples Marathi News

प्रत्येक नात्यात उत्साह टिकवण्यासाठी काहीतरी नवीन करणं किंवा प्रयोग करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही फक्त एक गोष्ट केलीत तर तुम्हाला त्या गोष्टीचा कंटाळा यायला वेळ लागणार नाही.  यावर उपाय म्हणजे एकावेळी अनेक प्रयोग करा. यामुळे तुमच्यासाठी लैंगिक संबंध ठेवणे सोपे होईल आणि तुम्हाला परफॉर्मन्सची चिंता होणार नाही. तुम्ही दोघेही एकमेकांशी घट्ट नाते निर्माण करू शकाल.

10/10

स्वतःला रिलॅक्स ठेवा

Sexual Performance Anxiety Health Tips For Newly married couples Marathi News

दैनंदिन जीवनात साध्या सोप्या टेक्निकचा वापर करा. जवळीक होण्याआधी दीर्घ श्वास घेणे, सजगता किंवा ध्यान करणे हे तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकते. स्वतःला रिलॅक्स ठेवलात तर लैंगिक संबंधात चांगले वातावरण मिळेल. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)