'नायक'साठी घेतलेले पैसे अजूनही शाहरुखकडे! पिक्चर सोडण्याबद्दल म्हणाला, '1 दिवसाचा CM..'

Shah Rukh Khan Was Suppose To Act In Nayak Movie: अभिनेता शाहरुख खाननेच यासंदर्भातील माहिती दिली असून आधी चित्रपटाला होकार दिल्यावर चित्रपटातून नेमकी माघार का घेतली या बद्दलचा खुलासाही केला आहे. जाणून घेऊयात शाहरुख नक्की काय म्हणाला आहे या चित्रपटातून बाहेर पडण्यामागील कारणासंदर्भात बोलताना...

| Jun 23, 2024, 17:11 PM IST
1/14

Shah Rukh Khan Nayak Movie

तुम्हाला माहितीये का आधी नायक चित्रपट शाहरुख खानला ऑफर करण्यात आलेला. त्याने याला होकारही दिला. यासाठी त्याने साईनिंग अमाऊंटही घेतली. मात्र नंतर अचानक चित्रपट सोडला. त्याने असं का केलं याचा खुलासाही केला आहे. तसेच घेतलेले पैसे अजूनही आपल्याकडेच असल्याचं तो म्हणालाय. तसेच शाहरुखने चित्रपट सोडून तो अनिल कपूरला मिळण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. यापूर्वीही असं कोणत्या चित्रपटासंदर्भात घडलंय जाणून घेऊयात रंजक किस्सा...

2/14

Shah Rukh Khan Nayak Movie

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानने जितके हिट चित्रपट दिले आहेत तितकेच चित्रपट त्याने आधी होकार देऊन नाकारलेही आहेत. विशेष म्हणजे शाहरुखने नकार दिल्यानंतर त्याच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून आलेल्या अभिनेत्यांच्या जोरावर हे चित्रपट दमदार हिट ठरलेत.

3/14

Shah Rukh Khan Nayak Movie

आपल्या एका मुलाखतीमध्ये शाहरुखनेच कशाप्रकारे त्याला 2001 साली प्रदर्शित झालेल्या आणि आजही अनेक राजकीय घडामोडींनंतर नेटकऱ्यांना आठवणाऱ्या दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकरने दिग्दर्शित केलेल्या 'नायक' चित्रपटाची ऑफर देण्यात आलेली हे सांगितलं आहे. 

4/14

Shah Rukh Khan Nayak Movie

एका साध्या पत्रकाराला मुख्यमंत्री मुलाखतीमध्ये एका दिवसासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची ऑफर देतात आणि त्यानंतर काय होतं हे 'नायक' चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.   

5/14

Shah Rukh Khan Nayak Movie

'नायक'  चित्रपट थेअरटरमध्ये चालला नाही मात्र टीव्हीमुळे या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आजही हा चित्रपट आवर्जून पाहिला जातो.

6/14

Shah Rukh Khan Nayak Movie

'रेडिफ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुखने आधी 'नायक' चित्रपटाला होकार दिला होता असं सांगितलं. मात्र पुढे काही कारणाने त्याला हा चित्रपट जमला नाही. शाहरुखने साइनिंग अमाऊंट म्हणून पैसे घेतल्याचंही सांगितलं.

7/14

Shah Rukh Khan Nayak Movie

आपण 'नायक'साठी सायनिंग अमाऊंट म्हणून केवळ 1 रुपया घेतला होता, असं शाहरुख म्हणाला. तसेच आपण या चित्रपटाच्या शुटींगसाठी एक गठ्ठा तारखा देण्यासही तयार होतो असंही तो म्हणाला.

8/14

Shah Rukh Khan Nayak Movie

"मी त्यांचा (दिग्दर्शक शंकर यांचा) 'नायक' चित्रपट स्वीकारला होता, हे त्यांनी तुम्हाला हे सांगितलं नाही का? मी त्यासाठी सायनिंग अमाऊंटही घेतली होती. किती तुम्हाला माहितीये का? एक रुपया. मी त्यांच्याकडून एक रुपया घेतला होता आणि त्यांना हव्या तेव्हा एकाच वेळी अनेक तारखा शुटींगसाठी देण्यास तयार असल्याचंही सांगितलं होतं," असं शाहरुख म्हणाला.

9/14

Shah Rukh Khan Nayak Movie

'नायक' हा 'मुद्धालवन' या मूळच्या दाक्षिणात्य चित्रपटावरुन घेण्यात आलेला. तो चित्रपट आपण पाहिल्याचं शाहरुख म्हणाला. मूळ चित्रपट आपल्याला आवडला होता, असंही शाहरुख म्हणाला. मात्र मग हिंदी रिमेकमध्ये त्याला का काम करता आलं नाही हे ही त्याने सांगितलं.

10/14

Shah Rukh Khan Nayak Movie

"हिंदीमध्ये मूळ चित्रपटाचा रिमेक करणं मला पटत नव्हतं. मी शंकर यांना म्हणालो ही, तमिळमध्ये एका दिवसाचा मुख्यमंत्री ही संकल्पना उत्तम वाटेल. मात्र उत्तर भारतामध्ये ही संकल्पना फारशी पटेल असं मला वाटत नाही. जशीच्या तशी ही संकल्पना उचलून हिंदीत चित्रपट केल्यास तो चालेल असं मला वाटतं नव्हते," असं शाहरुखने प्रांजळपणे सांगितलं.   

11/14

Shah Rukh Khan Nayak Movie

"पुढे या प्रोजेक्टमध्ये काही अडचणी आल्या. तशा या अडचणी काही मोठ्या नव्हत्या. मात्र काही गोष्टींसंदर्भात आमचे विचार जुळत नव्हते. त्यामुळे आम्ही या प्रोजेक्टवर एकत्र पुढे न जाण्याचं ठरवलं"

12/14

Shah Rukh Khan Nayak Movie

"मात्र माझ्याकडे अजूनही ती सायनिंग अमाऊंट आहे. मी दिलेलं तारखांचं आश्वासन आजही कायम आहे. तो एक अशी व्यक्ती आहे, ज्याच्याबरोबर मला काम करायचं आहे. माझ्यासाठी तो जेम्स कॅमरॉनसारखा आहे. तो फार मोठ्या स्तरावर मनोरंजक चित्रपट बनवतो. त्यांचे चित्रपट भव्यदिव्यच असतात," असंही शाहरुख शंकर यांच्याबद्दल म्हणाला होता.

13/14

Shah Rukh Khan Nayak Movie

शाहरुखने चित्रपट सोडल्यानंतर तो अनिल कपूरने स्वीकारला हे केवळ 'नायक'बद्दल घडलेलं नाही तर 'स्लम डॉग मिलेनियर'मध्येही शाहरुखने भूमिका नाकारल्यावर ती अनिल कपूरला मिळाली होती.

14/14

Shah Rukh Khan Nayak Movie

विशेष म्हणजे शाहरुखच्या करिअरला कलाटणी देणारा 'बाझीगर' चित्रपट आधी अनिल कपूरला ऑफर करण्यात आलेला. जो त्याने नाकारला आणि नंतर तिथे शाहरुखची वर्णी लागली होती.