6 बेडरुम, रिमोट कंट्रोल गॅरेज अन् खासगी स्विमिंग पूल; पाहा शाहरुखच्या 14 हजार स्क्वेअर फुटात उभ्या 'जन्नत'चे फोटो

दुबईचील प्राइम लोकेशन पाल्म जुमेराह येथे असणाऱ्या शाहरुखच्या बंगल्याची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. या जागेला मानवनिर्मित सर्वात मोठं आयलँड म्हणूनही ओळखलं जातं.   

Feb 24, 2024, 16:04 PM IST
1/9

Shahrukh Khan Dubai Villa Jannat Photo

शाहरुख खानचा मुंबईतील 'मन्नत' बंगला म्हणजे पर्यटनस्थळ झालं आहे. मुंबईत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा बंगला पाहायचा असतो. शाहरुखच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची रोज तितकीच गर्दी असते.  

2/9

Shahrukh Khan Dubai Villa Jannat Photo

शाहरुखचं मुंबईप्रमाणे दुबईतही आलिशान घर आहे. या बंगल्याचं नाव जन्नत आहे.   

3/9

Shahrukh Khan Dubai Villa Jannat Photo

शाहरुखने नुकतंच दुबईत झालेल्या एका कार्यक्रमात या बंगल्याचा उल्लेख केला होता. हा बंगला त्याला नखीलकडून भेट म्हणून देण्यात आला आहे. नखील दुबईतील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी आहे.   

4/9

Shahrukh Khan Dubai Villa Jannat Photo

पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशीद अली आपले शेजारी आहेत हे नुकतंच आपल्याला समजलं आहे. पुढील नवीन वर्ष मी त्यांच्यासह साजरा करेन असं शाहरुखने सांगितलं.   

5/9

Shahrukh Khan Dubai Villa Jannat Photo

दुबईतील प्राइम लोकेशन पाल्म जुमेराह येथे असणाऱ्या शाहरुखच्या बंगल्याची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. या जागेला मानवनिर्मित सर्वात मोठं आयलँड म्हणूनही ओळखलं जातं.   

6/9

Shahrukh Khan Dubai Villa Jannat Photo

गौरी खानने या बंगल्याचं इंटिरिअर केलं आहे. हा बंगला 14 हजार स्क्वेअर फूटात उभा आहे.   

7/9

Shahrukh Khan Dubai Villa Jannat Photo

शाहरुखच्या या विलामध्ये 6 मोठे बेडरुम्स, दोन रिमोट कंट्रोल गॅरेज आणि प्रायव्हेट पूल आहे. तसंच घऱासमोर समुद्र दिसतो. येथे जगभरातील सर्व सुविधा आहेत.   

8/9

Shahrukh Khan Dubai Villa Jannat Photo

शाहरुखच्या जन्नतमध्ये सहजासहजी कोणाला प्रवेश मिळत नाही. आतून व्हिला कसा दिसतो हे रहस्यच आहे. प्रत्येक ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.   

9/9

Shahrukh Khan Dubai Villa Jannat Photo

जन्नतला शाहरुखचं यश आणि उपलब्धी लक्षात घेत त्याप्रमाणे डिझाइन करण्यात आलं आहे. खान कुटुंब नेहमी सुट्ट्या घालवण्यासाठी येथे येत असतं.