Guru Pushya Yoga 2024 : शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग 'या' राशींना करणार श्रीमंत, तुमची रास आहे का?

Guru Pushya Yoga 2024 : या वर्षातील पहिली पौष पौर्णिमा 25 जानेवारी गुरुवार आहे. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हणतात. शिवाय यादिवशी शाकंभरी नवरात्र समाप्त होणार आहे. यादिवशी या वर्षातील पहिल गुरुपुष्यामृत योगसह अनेक दुर्मिळ योग जुळून आले आहेत. गुरुपुष्यामृत योग सकाळी 8.15 वाजेपासून 26 जानेवारी सकाळी 10.29 वाजेपर्यंत असणार आहे.   

Jan 24, 2024, 16:33 PM IST
1/7

पौर्णिमा ही देवी लक्ष्मीला समर्पित करण्यात आली आहे. त्यासोबत गुरुपुष्यामृत योग असा दुर्मिळ योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या लोकांना श्रीमंत होण्याची संधी मिळणार आहे.

2/7

मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभ ठरणार आहे. तुमची कामं मार्गी लागणार असून कोणाला पैसे दिले असल्यास ते परत मिळणार आहे. नवीन वस्तूंची खरेदी करणार आहात. नवीन काम सुरु करण्यासाठी ही उत्तम योग आहे.   

3/7

गुरुपुष्यामृत योग हा कर्क राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे. तर ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत आहात तो तुमच्या आयुष्यात येणार आहे. यादिवशी सोने खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ असणार आहे. नवीन लोकांची भेट तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.   

4/7

तुळा राशीसाठी गुरुपुष्यामृत योग चांगला ठरणार आहे. या योगात सुने खरेदी करणे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या करिअरमध्ये भरभराटी होणार आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. अचानक तुम्हाला पैसे मिळणार आहेत.   

5/7

वृश्चिक राशीसाठी गुरुपुष्यामृत योग सुखकारक ठरणार आहे. या लोकांना आंनदाची बातमी मिळणार आहे. जुना वाद संपुष्टात येणार आहे. हितशत्रू माघार घेणार असल्याने करिअरमधील संकट दूर होणार आहे. वाहन, यंत्र किंवा अन्य मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी तुम्हाला लाभदायक ठरणार आहे.

6/7

कुंभ राशीला गुरुपुष्यामृत योगावर धनलाभ होणार आहे. हा दिवस त्यांच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी दूर झाल्यामुळे तुम्ही चिंतामुक्त होणार आहात. लक्ष्मीचे स्तोत्र पठण तुम्हाला लाभदायक ठरणार आहे.

7/7

मीन राशीची थांबलेली कामं गुरुपुष्यामृत योगामुळे पूर्ण होणार आहेत. आर्थिक परिस्थिती तुमची सुधारणार आहे. यशाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. लक्ष्मी स्तोत्र पठणाचा तुम्हाला लाभ होईल. एखादी वस्तू यादिवशी नक्की खरेदी करा. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)