शिवम दुबे नाही तर हैदराबादचा 'हा' खेळाडू घेणार हार्दिक पांड्याची जागा, शेन वॉट्सनने टोचले बीसीसीआयचे कान

Shane Watson on Nitish Kumar Reddy : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. यामध्ये दोन फास्टर ऑलराऊंडरला संधी देण्यात आली आहे. 

| May 04, 2024, 20:30 PM IST

Shane Watson Statement : टीम इंडियामध्ये हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना संधी देऊन रोहित शर्मा संघात बॅलेन्स साधला आहे.

1/7

संघ जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी 'सध्या आमच्याकडे हार्दिकसाठी कोणताही बॅकअप खेळाडू नाही', असं वक्तव्य केलं होतं.

2/7

एकीकडे शिवम दुबेला संघात जागा देण्यात आली आहे. त्यामुळे आता बॅकअप ऑलराऊंडर खेळाडू म्हणून कोणताही खेळाडू नाहीये का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

3/7

मात्र, बीसीसीआयला जे दिसतं नाही, त्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉट्सन याने सल्ला दिलाय. शेन वॉट्सनने पांड्याची रिप्लेसमेंट शोधून काढलीये.

4/7

शेन वॉट्सन हैदराबादचा नितीश कुमार रेड्डी याच्याकडे पांड्याचा रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून बघतो. शेनने त्याचं कौतूक देखील केलंय.

5/7

नितीशने राजस्थानविरुद्ध खेळलेल्या खेळीचे शेन वॉटसनने भरभरून कौतूक केलं. नितीशमध्ये जगातील कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध धावा काढण्याची क्षमता आहे, असं वॉट्सन म्हणतो. 

6/7

हार्दिकचा बॅकअप म्हणून खेळताना दिसण्याची ताकद नितीशमध्ये आहे. नितीश लवकरच भारतीय संघासाठी पदार्पण करताना दिसेल, असं शेन वॉट्सनने म्हटलं आहे.

7/7

दरम्यान, नितीश रेड्डी ज्याप्रकारने आयपीएलमध्ये कामगिरी करतोय, ज्याप्रकारे बॉलिंग आणि बॅटिंग करतोय, त्यामुळे तो येत्या काळात नक्कीच प्रभावित करेल, असंही शेनने म्हटलंय.