Shani Dev Secrets : लोक शनिदेवाच्या डोळ्यात पाहण्यास का घाबरतात? जाणून घ्या 6 आश्चर्यकारक रहस्ये
Shanidev Puja : नऊ ग्रहांमधील शनि या ग्रहाचं नाव घेतलकीच सर्वांना भीती वाटते. अगदी शनिदेवाच्या मंदिरात जाण्याबद्दलही अनेक नियम आहे. शनिदेवाच्या पूजेत काही चुक झाली की त्याचा प्रकोपाला समोर जावं लागतं अशी मान्यता आहे.
1/7
2/7
शनिदेव न्यायदेवता का आहे?
सर्व नऊ ग्रहांचं आपलं असं महत्त्व आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा, बुध मंत्री, मंगळ सेनापती आणि शनिदेव हा न्याय किंवा कर्मदाता मानला गेला आहे. जगातील लोकांना चांगल्या कर्माची चांगली फळं आणि वाईट कर्मासाठी शिक्षा शनिदेव देत असतो. शनि देव हा आपल्या कर्माचा हिशोब ठेवतो. त्यामुळे त्याच्या नजरतून कोणीही वाचत नाही. शनि धैय्या आणि सती सतीपासून राहू आणि केतू शिक्षा देण्यासाठी सक्रिय करण्यात येतात.
3/7
शनिदेवाच्या डोळ्यात का पाहू नये?
4/7
लोक शनिदेवाच्या दर्शनाला का घाबरतात?
लोक शनिदेवाच्या मंदिरात त्याचा दर्शनाला जाण्यास घाबरतात. यामागे हिंदू धर्मात एक कथा आहे, शनिदेवाची पत्नी परम तेजस्विनी एका रात्री शनिदेवाकडे पुत्रप्राप्तीसाठी आली. मात्र तेव्हा शनिदेव भगवान विष्णूच्या ध्यानात मग्न होते. पत्नीने बराच वेळ वाट पाहिली पण शनिदेव ध्यात मग्न होते. तेजस्विनीने त्यांना विनंती केली पण त्यांनी दुर्लक्ष केलं. तेजस्विनी यांना राग आला आणि त्यांनी शनिदेवाला शाप दिला. शनिदेव जे काही पाहिल ते नाश होईल. त्यामुळे शनिदेवाच्या दर्शनाला लोक घाबरतात.
5/7
शनिदेवाला मोहरीचे तेल का अर्पण करतात?
कथांनुसार, एकदा सूर्यदेवांचे शिष्य भगवान हनुमान त्यांच्या विनंतीवरून शनिदेवांना समजविण्यासाठी गेले होते. शनिदेवाने हनुमानजींने वारंवार सांगूनही ते ऐकत नव्हते. परिणाम हनुमान आणि शनिदेवाच युद्ध झालं ज्यात हनुमानजी विजय झाले. या युद्धात शनिदेव गंभीर जखमी झाले त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी हनुमानजींनी मोहरीचे तेल लावले. त्यामुळे संकट दूर करण्यासाठी शनिदेवाला मोहरीचं तेल अर्पण केलं जातं.
6/7
शनिदेवाजवळ दिवा का लावतो?
शनिदेवाचा सर्वात आवडता दिवस म्हणजे शनिवार असून या दिवशी बहुतेक लोक शनिदेवाच्या मूर्ती किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतात. शनिदेव हे अंधाराचे अवतार मानले जातात. सूर्यास्तानंतर ते खूप शक्तिशाली होतात, अशी मान्यता आहे. जर कुंडलीतील शनि बिघडला तर दुःख आणि दारिद्र्य तुमच्या आयुष्यात एन्ट्री करतात. अशा परिस्थितीत शनिवारी संध्याकाळी दिवा लावल्याने जीवनातील अंधार दूर होऊन शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.
7/7