Kendra Trikon Rajyog : शनि वक्रीमुळे लवकरच केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना अपार पैसा?

Vakri Shani Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत शनिदेव 17 जून 2023 ला वक्र होणार आहे. या स्थितीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. 

Jun 01, 2023, 10:44 AM IST

Vakri Shani Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु आणि शनी ग्रहाला विशेष महत्त्व आहे. गुरु आणि शनि गोचर हे मनुष्याचा जीवनावर दीर्घ काळ परिणाम करतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा गुरु आणि शनी या ग्रहांची स्थिती बदलते तेव्हा तेव्हा आपल्या जीवनावर त्याचा सकारात्मक आणि नराकात्मक परिणाम दिसतात. जून महिन्याची सुरुवात झाली आहे, या महिन्यात चार ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. या महिन्यात सर्वात महत्त्वाचा ग्रह शनी उलटी चाल चलणार आहे. (shani vakri will make kendra trikon rajyoga these zodiac signs will shine 17 june till november)

1/6

केंद्र त्रिकोण राजयोग

शनिदेव हा न्यायदेवता म्हणून ओळखला जातो. तो तुम्हाला तुमच्या कर्माची फळं देतो. चांगल कर्म शुभ आणि वाईट कर्माची शिक्षा देतो असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं जातं. शनी गोचर किंवा शनी वक्री हे नेहमी अशुभ नसतं. शनी वक्रीमुळे त्रिकोण राजयोग तयार होतो आहे. या राजयोगामुळे काही राशींना  धनलाभ होणार आहे. 

2/6

कधी आहे शनिवक्री?

शनिदेव 17 जून 2023 ला रात्री 10:48 ला कुंभ राशीत वक्री होणार आहे. यामुळे काही जातकच्या कुंडली केंद्र त्रिकोण राजयोग बनतोय. 

3/6

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग आर्थिक प्रगती घेऊन आला आहे. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कमाईचे अनेक मार्ग उपलब्ध होणार आहे. मालमत्ता खरेदी करणार आहात. नवीन जबाबदारी मिळणार आहे.   

4/6

सिंह (Leo)

केंद्र त्रिकोण राजयोग या राशीसाठी अतिश्य शुभ ठरणार आहे. सिंह राशीच्या लोकांच्या कुंडलीत दुहेरी योग तयार होत आहे. केंद्र राजयोग आणि शश राजयोग तयार होत आहे. या लोकांना अनेक मार्गाने आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात हा आतापर्यंतचा सर्वात चांगला काळ ठरणार आहे.     

5/6

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग सर्वात्तम ठरणार आहे. त्यांना नशिबाची साथ काय असते ते समजणार आहे. अनेक वर्षांचे परदेशवारीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अनेकांशी ओळख होणार आहे. ही ओळख तुमच्यासाठी भविष्यात धनलाभ घेऊन येणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.

6/6

तूळ (Libra)

केंद्र त्रिकोण राजयोगाचा 'या' राशीच्या लोकांना सर्वाधिक लाभ होणार आहे. तूळ राशीच्या स्वामी शुक्र आणि शनीदेव हे मित्र असल्याने या राशींनी शनि वक्रीमुळे सर्वाधिक फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)