'या' 6 चित्रपटातील अभिनयानं श्रद्धा कपूरनं जिंकली प्रेक्षकांची मनं

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनं तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहे. तिनं आजवर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले. चला तर जाणून घेऊया तिचे कोणते असे 6 चित्रपट आहेत जे तुम्ही पाहू शकता. 

| Mar 03, 2024, 17:59 PM IST
1/7

श्रद्धाचा वाढदिवस

श्रद्धाचा आज 3 मार्च रोजी 37 वा वाढदिवस साजरा केला. श्रद्धाचे सगळेच चित्रपट काही हिट झाले असे नाही तर तिचे काही चित्रपट हे फ्लॉपही झाले. चला तर पाहूया तिचे टॉप 6 चित्रपट. 

2/7

'आशिकी 2'

2010 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या श्रद्धा कपूरनं पहिलाच रोमॅन्टिक म्यूजिकल चित्रपट केला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 

3/7

'एक विलेन'

श्रद्धा कपूरच्या 'एक विलेन' या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा महत्त्वाच्या भूमिकेत होता. तर रितेश देशमुख हा खलनायकाच्या भूमिकेत दिसला. त्या तिघांच्या अभिनयाची सगळ्यांनी स्तुती केली होती. 

4/7

'स्त्री'

सगळ्या पुरुषांना जिची भीती वाटते अशी वाईट आत्मा म्हणजेच 'स्त्री'... याच पटकथेवर हा चित्रपट आधारीत आहे. या चित्रपटाच तिच्यासोबत राजकुमार राव महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. 

5/7

छिछोरे

या चित्रपटात श्रद्धा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली होती. यात मुलांच्या आयुष्यात असलेलं स्ट्रगल हे दाखवण्यात आलं आहे. 

6/7

'तू झूठी मैं मक्कार'

'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांनी महत्त्वाची भूमिका साकरली होती. श्रद्धा कशी स्वत: नातं मोडण्यासाठी बॉयफ्रेंडकडेच मदत मागते. 

7/7

'एबीसीडी 2' आणि 3

या चित्रपटात श्रद्धा वरुण धवनसोबत दिसली होती. त्यांच्या हा डान्स चित्रपटात त्या दोघांचे डान्स स्किल्स प्रेक्षकांना प्रचंड आवडले.