PHOTO : 15 दिवसात, 15 मिनिटांत रेखासोबत डेब्यू चित्रपट, 'त्या' बोल्ड सीननंतर सर्वत्र त्याचीच चर्चा...

Birthday Special : बॉलिवूड जगात कोणी रातोरात स्टार ठरतो तर काहींना खूप मोठ्या संघर्षांनंतर यश मिळायला लागतं. असाच एक अभिनेता होता ज्याने रेखासोबत डेब्यू केलं. पण त्यानंतरही त्याला यशाच शिखर गाठण्यासाठी मोठ्या संघर्ष करावा लागला. 

Jun 14, 2024, 12:00 PM IST
1/7

या अभिनेत्याने चित्रपट आणि टीव्ही दोन्हीमध्ये आपलं नशिब आजमावलं. करिअरच्या सुरुवातीला डिंपल कपाडिया, पद्मिनी कोल्हापुरे आणि रेखा या अभिनेत्रींसोबत त्याने काम केलं. त्याला पहिला चित्रपट 15 दिवसात, 15 मिनिटांत मिळाला. 

2/7

आम्ही बोलत आहोत, शेखर सुमनबद्दल...1984 मध्ये रेखाच्या 'उत्सव' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. आज अभिनेता त्याचा 62 वा वाढदिवस सेलिब्रेट करतोय. एक काळ असा होता त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. मात्र आज तो मालमाल आहे. 

3/7

शेखर 20 वर्षांचा असताना शमी या जुन्या अभिनेत्रीने त्या एका चित्रपटात छोटी भूमिका दिली होती. त्या चित्रपटात राखी आणि शशी कपूर मुख्य भूमिकेत होते. याच वेळी शेखरच्या नशिबाचा तारा चमकला.

4/7

खुद्द शेखर सुमनने एका मुलाखतीत याचा खुलासा केला की, त्या काळातील जुन्या अभिनेत्री शमी आंटीमुळेच शेखरची शशी कपूरशी भेट झाली. शशी कपूरने त्याला पाहिताच आपल्या एका चित्रपटासाठी त्याला साईन केलं. 

5/7

शेखरने पुढे सांगितलं की, त्यानंतर शशी कपूर यांनी 1994 मध्ये प्रदर्शित झालेला उत्सव या चित्रपटासाठी शेखर सुमनला पहिल्यांदाच रेखाच्या बरोबर काम करण्याची संधी दिली. 

6/7

त्यावेळी शेखरला मुंबईत येऊन अवघे 15 दिवस झाले होते आणि अवघ्या 15 मिनिटांच्या भेटीनंतर शेखर सुमनला या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली. या चित्रपटात रेखा आणि शेखर सुमन यांच्यातील अतिशय इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले होते, या चित्रपटाने शेखरला रातोरात ओळख मिळवून दिली होती. 

7/7

त्यानंतर शेखर आज पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. मनिषा कोईरालासोबतच्या त्या इंटिमेट सीनमधील अभिनयामुळे त्याच कौतुक होतंय.