डॉक्टरांनी सांगितलं अबॉर्शन करा, आईने ऐकलं असतं तर आज ही अभिनेत्री जगात नसती; कोण आहे ती?

Entertainment News : आईने डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अबॉर्शन केलं असतं तर आज ही चिमुकली जगात नसती. ही चिमुकली आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Sep 11, 2023, 07:57 AM IST

Entertainment News : एकेकाळी रंगावरुन तिला बॉलिवूडमध्ये फार काळ टिकता येणार नाही असं म्हटलं जायचं. पण आज ती बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या फिटनेसने तिने सर्वांना घायाळ केलं आहे. योगा करणारी ही अभिनेत्री एकेकाळी अक्षय कुमारची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. 

1/10

1993 मधील काजोल आणि शाहरुख खानसोबतचा चित्रपटातून तिने पदार्पण केलं. त्यावेळी तिचं वय 17 वर्षांचं होतं. 

2/10

या अभिनेत्रीच्या आईला डॉक्टरांनी गर्भपात करण्यास सांगितलं होतं. जर त्यांनी ते ऐकलं असतं तर आज ही अभिनेत्री जगात नसती. 

3/10

आलं का तुमच्या लक्षात आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत ते. ही अभिनेत्री आहे शिल्पा शेट्टी. 

4/10

शिल्पा शेट्टी सध्या तिच्या आगामी चित्रपट सुखीचा प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिने एका पंजाबी हाऊस वायफ सुखप्रीत कालराच्या भूमिकेत आहे. 

5/10

शिल्पा कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. तिची किलर फिगर असो किंवा तिचा ड्रेसिंग सेन्स असो, चाहत्यांना तिची प्रत्येक गोष्ट आवडते. 

6/10

या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने त्याच्या जन्माबद्दलचा धक्कादायक खुलासा केला.  तिच्या आईला डॉक्टरांनी गर्भपात करण्यासाठी सांगितलं होतं. 

7/10

आई सुनंदा शेट्टी यांनी सांगितलं की, शिल्पा शेट्टीच्या जन्माच्या वेळी गर्भधारणेतील गुंतागुंतांमुळे गर्भपात करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

8/10

माझ्या आईला सतत अंधत्व येत असल्याने तिचा लवकरच गर्भपात होईल, अशी भीती डॉक्टरांना वाटत होते. 

9/10

गर्भधारणाच्या वेळी आईला खूप रक्तस्त्राव होत होता. तरीदेखील माझा जन्म झाला आणि मी वाचले.

10/10

त्यामुळे माझ्या आईला वाटतं माझी जन्म कुठल्या तरी कारणासाठी झाला आहे. शिल्पा पुढे म्हणाली की, चित्रपट माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. कदाचित मी अशा लोकांसाठी प्रेरणा बनणार आहे जे खूप काही सहन करत आहेत.