जिने चढताना लगेच धाप लागते? कारण काय? वेळीच हे उपाय करा

पायऱ्या चढताना धाप लागते, असं अनेक जणांच्या बाबतीत होते. पण असे का होतं. याचे कारण जाणून घेऊया

| Jun 09, 2023, 19:53 PM IST

Out of Breath Walking Up Stairs: पायऱ्या चढताना धाप लागते, असं अनेक जणांच्या बाबतीत होते. पण असे का होतं. याचे कारण जाणून घेऊया

1/5

जिने चढताना लगेच धाप लागते? कारण काय? वेळीच हे उपाय करा

shortness of breath while climbing stairs know the reason

आजच्या धावपळीच्या काळात आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. जंक फुड, व्यायामाचा अभाव तसंच तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे यामुळं शरीर आतून कमजोर पडत आहे. आता लिफ्ट आणि सरकते जिने यामुळं पायऱ्यांचा वापर करणे अनेक जण टाळतात. मात्र कधीतरी जिने चढण्याची वेळ आल्यावर खूप दम लागतो. असं का होतं जाणून घ्या 

2/5

आजाराचे संकेत

shortness of breath while climbing stairs know the reason

पायऱ्या चढताना धाप लागत असेल तर याच्यामागे अनेक कारणे असू शकतात. शरीराला पोषक तत्वे मिळत नसतील तरी ही समस्या निर्माण होऊ शकते. अनेकदा आहारात पोषक तत्वाचे समावेश केल्यानंतरही व्यायम करताना धाप लागते. तर हे एखाद्या आजाराचे संकेत असू शकतात. 

3/5

वेळीच लक्ष द्या

shortness of breath while climbing stairs know the reason

झोप न येणे, मानसिक स्वास्थ, अॅनिमिया या कारणांमुळं ही सतत थकवा जाणवतो. पायऱ्या चढताना तुम्हालाही दम लागत सेल तर या गोष्टी आत्ताच लक्षात घेऊन त्या फॉलो करण्याचा प्रयत्न करा.   

4/5

या गोष्टी फॉलो करा

shortness of breath while climbing stairs know the reason

- शरीराचे वजन जास्त असणे. - झोपण्याच्या व सकाळी उठण्याच्या वेळा अनियमित असतील - रोज रात्री पुरेशी झोप घ्या तसंच सकाळी किंवा दुपारी झोपणे टाळा - हेल्दी डाएट घ्या.  - रोज व्यायाम व योगा करा 

5/5

डॉक्टरांची भेट घ्या

shortness of breath while climbing stairs know the reason

वरील गोष्टीचे नियमित पालन करुनही लवकर धाप लागणे किंवा थकवा येत असेल तर लगेचच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण वरील लक्षणे ही Chronic Fatigue Syndromeची देखील असू शकतात.