Silver Wearing Benefits : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांसाठी चांदी शुभ?

Silver Wearing Benefits : महिला असो पुरुष हे सोनं आणि चांदीचे ज्वेलरी वापरतात. महिलांना तर सोने चांदीचे दागिने खूप आवडतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार कुठलंही रत्न हे प्रत्येकासाठी नसतात. चांदी ही काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरते. 

May 27, 2024, 14:04 PM IST
1/7

असंख्य महिला त्यांच्या हातात चांदीची पैजण किंवा अंगठी घालतात. दागिन्यांनी स्त्रियांचं सौंदर्य वाढतं. पण ज्योतिषशास्त्रानुसार चांदी ही प्रत्येकासाठी शुभ नसते. 

2/7

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार रत्न धारण केले पाहिजे. अन्यथा त्या रत्नाचा फायदा होण्याऐवजी नुकसान होतं, अशी शास्त्रात मानलं जातं. 

3/7

ज्योतिषशास्त्रानुसार चांदी हा चंद्र आणि शुक्र ग्रहाचा कारक मानलं गेलं आहे. चंद्र मनासाठी तर शुक्र लक्झरी आणि सर्जनशीलतेसाठी जबाबदार असतो. 

4/7

त्यामुळे जर तुम्ही चांदीचे दागिने घातले असेल तर या दोन्ही गोष्टींचा विकास होतो अशी मान्यता आहे. कोणत्या राशीच्या लोकांसाठी चांदी शुभ आहे,  जाणून घ्या.

5/7

वृषभ रास

वृषभ राशीचा स्वामी चंद्र असल्याने या लोकांसाठी चांदी धारण करणे खूप शुभ असतं. चांदी घातल्याने वृषभ राशीचे लोक रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. ते कोणत्याही भांडणात पडत नाहीत. करिअरमध्येही यश मिळतं. या राशीचे लोक खूप मेहनती असतात. पण अनेकदा मेहनत करूनही त्यांना यश प्राप्त होत नाही. त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना लाभत नाही. अशा स्थितीत चांदीचे दागिने घालणे शुभ ठरतं. तुमचे नशीब पूर्णपणे साथ देतं आणि तुम्हाला लवकरच यश मिळतं. 

6/7

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठीही चांदीचे दागिने घालणे शुभ मानले जाते. चांदी धारण केल्याने त्यांचे मानसिक संतुलन राखलं जातं. शिवाय मन शांत राहण्यास मदत मिळते आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळतो. या राशीच्या लोकांना अतिविचार करण्याची वाईट सवय असल्याने खूप भावनिक असतात. त्यामुळे या लोकांनी चांदीचे दागिनी घातल्यास भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. त्याशिवाय जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो. चांदी धारण केल्याने तुमचं आरोग्य चांगल राहण्यास मदत मिळते. 

7/7

तूळ रास

तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्याने जो विलासी जीवनाचा कारक आहे. या राशीचे लोक आपले सर्व काम खूप विचारपूर्वक करतात. मात्र अनेक वेळा हे लोक विचारांमध्ये मग्न असतात. चांदी धारण केल्याने त्यांच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. चांदी धारण केल्यानंतर जीवनात चांगले बदल दिसायला लागतात. त्यांचे आरोग्यही सुधारण्यास मदत मिळते. आयुष्यातील अनेक समस्या नाहीशा होतात. त्यांना कौटुंबिक आणि आर्थिक मदतही मिळते. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)