Sofa Cleaning Tips: घरातील जुने सोफेही दिसतील नवे कोरे, फक्त सफाई करण्याआधी वाचा 'या' सोप्या टीप्स

Sofa Cleaning Tips : प्रत्येक घरात आपल्याला सोफा दिसतो. पण सोफा जर साफ नसेल तर आपल्याला तिथे बसायलाही कसं तरी वाटतं. त्याच प्रमाणे ज्या व्यक्तीच्या घरी पाहुणे येतात आणि आपला सोफा साफ नाही किंवा घाणेरडा दिसत आहे. हे लक्षात येताच आपल्याला लाज वाटू लागते. पण त्यांना साफ कसं करायचं हे अनेकांच्या लक्षात येत नाही. फक्त इतकंच नाही तर सोफा साफ नसेल तर अनेक आजार होण्याची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे घरातील लोक आजारी पडू शकतात. आजा आपण सोफा साफ करण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया...

| May 05, 2023, 18:32 PM IST
1/7

महाग सोफे साफ करण्याची भीती

Sofa Cleaning Tips

बऱ्याच लोकांच्या घरात हे लेदर म्हणजेच चामड्याचे सोफे असतात. हे सोफे खूप महाग असतात. त्या सोफ्यांची सफाई करायची असेल तर स्लो स्पीड असणाऱ्या क्लीनरचा वापर करा. 

2/7

लेदरचे सोफे साफ करण्यासाठी कोणते क्लीनर घ्यावे

Sofa Cleaning Tips

जर तुमचे लेदरचे सोफे आहेत तर तुम्ही चांगल्या कंपनीते क्लीनर घ्यायला हवे. त्या क्लीनरचे ब्रश हे खूप सॉफ्ट आणि वॅक्युम क्लिनरचाच वापर करा. 

3/7

कपड्याचे सोफे

Sofa Cleaning Tips

बऱ्याच लोकांना कपड्याचे सोफे आवडतात. या सोफ्यात बसायलाही कम्फर्टेबल वाटते. हे सोफे साफ करणं खूप कठीण काम असतं. 

4/7

कपड्याचे सोफे साफ करण्याची पद्धत

Sofa Cleaning Tips

कपड्याचे सोफे साफ करण्यासाठी अंघोळीच्या साबनाचा पाच चमचे चुरा घ्या. त्यानंतर त्यात एक कप गरम पाण्यात हे मिक्स करा. त्यानंतर त्यात 2 चमचे अमोनिया आणि सोडियम बोरेट घाला. थंड झाल्यावर स्पंजच्या मदतीन सोफ्याला साफ करा. 

5/7

सोफा साफ करण्याची दुसरी पद्धत

Sofa Cleaning Tips

एका भांड्यात 2 कप कोमट पाणी घ्या. त्यात 1 चमचा भांडी धुवायचं लिक्वीड आणि एक चमचा व्हिनेगर घाला. त्यानं सोफा पुसून काढा. 

6/7

बेकिंग सोड्याचा मदतीनं करा साफ

Sofa Cleaning Tips

बेकिंग सोडा फक्त जेवणात नाही तर अनेक गोष्टींमुळे वापरू शकतो. बेकिंग सोड्याची पेस्ट ही ज्या ठिकाणी डाग आहे तिथे लावा आणि 10-15 मिनिटं ठेवा त्यानंतर वॅक्युम क्लिनरनं ते साफ करा. 

7/7

सोफा साफ करताना घ्यायची काळळी

Sofa Cleaning Tips

सोफा साफ करताना त्याला जोर जोरात घासू नका. त्यानं सोफ्याचा रंग जाण्याती शक्यता असते किंवा मग त्या ठिकाणचा कपडा खराब होण्याची शक्यता. (All Photo Credit : Pexels)