Photo : साउथ इंडियन लुकमधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठी अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट. साउथ इंडियन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष. पाहा कोण आहे 'ही' अभिनेत्री? 

| Jul 31, 2024, 19:02 PM IST
1/6

फुलाला सुगंध माती

'फुलाला सुगंध माती'चा फेम मराठी अभिनेत्री समृद्धी केळकर. याच मालिकेतून समृद्धी घराघरात पोहोचली आहे. 

2/6

प्रचंड सक्रिय

अभिनयाने आणि हटके अंदाजाने समृद्धी केळकर प्रेक्षकांची मने जिंकत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री प्रचंड सक्रिय असते. 

3/6

साऊथ इंडियन लुक

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट साऊथ इंडियन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

4/6

घागरा-चोळी

या दाक्षिणात्य फोटोशूटसाठी तिने पांढऱ्या रंगाची घागरा-चोळी परिधान केली आहे. त्यावर लाल रंगाची ओढणी घेतली आहे. 

5/6

गोल्डन ज्वेलरी

या फोटोमध्ये अभिनेत्रीने गोल्डन ज्वेलरीसह केसांची हेअरस्टाईल केली आहे.  समृद्धीचं लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांना खूपच आवडलं आहे. 

6/6

कमळाचे फूल

त्याचबरोबर अभिनेत्रीने हातात कमळाचे फूल घेऊन फोटोशूटसाठी खास पोज दिल्या आहेत.