World Cup मध्ये सतत दिसणाऱ्या 'या' खास चिन्हांचा अर्थ काय?

यंदाचा वर्ल्डकप अत्यंत खास मानला जातोय. पण या वर्ल्डकपमध्ये अजून एक खास गोष्ट आहे. वर्ल्डकपचे सामने पाहताना तुम्हाला अशी वेगळी चिन्ह दिसली का? या चिन्हांचा नेमका अर्थ काय? 

| Nov 06, 2023, 09:15 AM IST

यंदाचा वर्ल्डकप अत्यंत खास मानला जातोय. पण या वर्ल्डकपमध्ये अजून एक खास गोष्ट आहे. वर्ल्डकपचे सामने पाहताना तुम्हाला अशी वेगळी चिन्ह दिसली का? या चिन्हांचा नेमका अर्थ काय? 

1/10

आयसीसीने या चिन्हांना ‘नवरस’ असं संबोधलं असून भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपच्या संदर्भात ‘नऊ भावना’ दर्शविण्यासाठी या चिन्हांचा वापर केला जातोय. या नऊरसातील प्रत्येक चिन्ह काय भावना दर्शवते हे पाहूयात

2/10

आनंद

आनंद

आयसीसीच्या या लोगोमध्ये प्रथम जॉयचं चिन्ह दाखवण्यात आलंय. म्हणजेच आनंद. सामन्यादरम्यान, चाहत्यांना त्यांचा आवडता संघ जिंकल्यावर ही भावना जाणवते.

3/10

शक्ती

शक्ती

दुसऱ्या चिन्हाचा अर्थ शक्ती आहे. हे चिन्ह खेळाडूंची ताकद दाखवते. 

4/10

आदर

आदर

तिसरं चिन्ह हे चाहत्यांना आणि खेळाडूंचा समान आदर दाखवण्यासाठी आहे.

5/10

अभिमान

अभिमान

या चिन्हाचा अर्थ अभिमान आहे. प्रत्येक खेळाडूला देशाच्या राष्ट्रगीतादरम्यान हा अभिमान वाटतो.  

6/10

शौर्य

शौर्य

या चिन्हाचा अर्थ शौर्य असा आहे. जेव्हा एखादा खेळाडू मैदानात जखमी होऊनही विजयासाठी लढत राहतो तेव्हा त्याचा वापर केला जातो.

7/10

गौरव

गौरव

विश्वचषक विजेतेपद मिळवणे आणि अंतिम वैभवाचे ध्येय गाठणं हे या लोगोचं उदाहरण आहे.

8/10

आश्चर्य

आश्चर्य

या चिन्हाचा अर्थ आश्चर्यकारक आणि अनपेक्षित गोष्टींसाठी वापरला जातोय.

9/10

पॅशन

पॅशन

या चिन्हाचा वापर खेळाडू आणि चाहत्यांची पॅशन दाखवण्यासाठी केला जातोय.

10/10

वेदना

 वेदना

खेळाडू आणि चाहत्यांची पीडा मांडण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जात आहे