वाट्टेल तिथे झोपड्या बांधून डबल सदनिका घेतलेल्यांचे सदनिका परत घेणार; SRA चा मोठा निर्णय

अनेक झोपड्या बांधून सदनिका मिळवणाऱ्यांना चाप बसणार आहे. आता यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. 

Aug 29, 2023, 00:01 AM IST

SRA : वाट्टेल तिथे झोपड्या बांधून डबल सदनिका घेणा-यांची आता खैर नाही. एकापेक्षा अधिक सदनिकांचा लाभ घेतलेल्यांच्या अतिरिक्त सदनिका ताब्यात घेऊन त्या पुन्हा प्रकल्पग्रस्तांसाठी दिल्या जाणार आहेत.

1/5

आतापर्यंत SRAनं 13 हजार 564 अनधिकृत सदनिकाधारकांना नोटीस बजावलीये. तर 212 सदनिका ताब्यात घेण्यात आल्यात.

2/5

अनेक झोपड्या बांधून एकापेक्षा अधिक सदनिकांचा लाभ घेतलेल्यांच्या अतिरिक्त सदनिका ताब्यात घेतल्या जाणार आहेत. 

3/5

न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर अखेर SRAला जाग आली आहे.

4/5

हायकोर्टानं या बाबत हस्तक्षेप करत SRAच्या अंदाधुंद कारभारावर आणि प्रशासनाला कडक शब्दांत ताशेरे ओढलेत.

5/5

झोपडीधारकांचे आधार कार्ड, वीज बिल, मतदान कार्ड तसंच इतर सरकारी दस्तावेज एकमेकांशी लिंक केलं जाणार आहे.