सनी देओल पुन्हा करणार बॉक्स ऑफिसवर 'गदर' बॉर्डर 2 ची घोषणा

Jun 14, 2024, 17:02 PM IST

सनी देओल पुन्हा करणार बॉक्स ऑफिसवर 'गदर' बॉर्डर 2 ची घोषणा 

 

1/9

अभिनेता सनी देओलने गुरूवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 1997चा ब्लॉकब्लास्टर चित्रपट बॉर्डर सिक्वेल याबद्दल सांगितले.ज्यामध्ये भारत पाकिस्तान युद्धावर चित्रित करण्यात आला होता.

2/9

 जे.पी. दिग्दर्शित चित्रपटात अभिनेता सनी देओलने युनिट कमांडिंग ऑफिसरची भूमिका साकारली होती.   

3/9

अभिनेता सनी देओलने आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट वर असे कॅप्शन दिले आहे की, 27 साल पेहेले एक फौजी ने वादा किया था की वो वापस आयेगा. उसी वादे को पूरा करने, हिंदूस्तान की मिट्टी को अपना सलाम कहने, आ रहा है.  

4/9

अभिनेता सनी देओलने आपल्या इन्स्टाग्रामवर  व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की Border -2 ही India's biggest war film" असेल.   

5/9

Border -2 चित्रपटाची तारीख अजून रिलिज केल नाही पण सनी देओलने चित्रपटामधील काम करणाऱ्यांची नावे सांगितली आहेत.

6/9

Border -2 चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे तर चित्रपटाची निर्मिती भुषण कुमार, कृष्णा कुमार, जे.पी.दत्त आणि निधी दत्त यांनी केले आहे. अनुराग सिंग यांनी दिल बोले हडिप्पा, जट अॅड ज्युलिएट, पंजाब 1984 आणि केसरी यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांचे देखील दिग्दर्शन केले आहे.

7/9

रिपोर्टनुसार अभिनेता आयुष्मान खुराना देखील Border -2मध्ये असेल अशी शक्यता आहे पण अजून त्याचे नाव घेतले नाही.

8/9

सनी देओलच्या गदर-2 चित्रपटाच्या यशानंतर Border -2 घोषणा केली. 2001मध्ये  आलेला गदर: एक प्रेम कथा पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली तर  गदर-2 हा वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरला ज्याने 600 कोटींहून अधिक कमाई केली .   

9/9

इंटरनेटवर चाहत्यांचा प्रतिसाद-

Border -2 चित्रपटाच्या घोषणे नंतर इंटरनेट वापरकर्त्यांनी उत्साह व्यक्त केला आहे. एका यू़जरने असे लिहिले आहे की, मी खूप आनंदी आहे कारण माझे बालपण परत आले तर एकाने असे म्हटले आहे की, सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा आणि एका यूजरने म्हटले आहे की  गदर-2 च्या नंतर Border -2 हा देशभक्ती पीक वर असेल.