सुप्रिया सुळेंना वडिलांकडून झुकतं माप मिळणार? लेकीनं दिली पावलोपावली साथ
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसर्वे शरद पवार यांनी मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली. मग चर्चा सुरु झाली पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार. वडील शरद पवार यांचं लेक सुप्रियाला झुकतं माप मिळले का?
Supriya Sule : मंगळवारी 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकारणातील चाणक्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली. (Supriya Sule or Ajit Pawr Who Will be Next NCP Chief Know Supriya Sule Political Journey Relation with Sharad Pawar and more)








राज्यातील युवतींना पक्षासोबत जोडण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेस सुरू झाली. त्यानंतर राज्यात होणाऱ्या स्त्री-भ्रूण हत्यांविरोधात सुप्रिया सुळे पुढाकार घेतला. याविरोधात त्यांनी राज्यभर अभियान केली. अशाप्रकारे त्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सुप्रियाताई म्हणून जवळच्या वाटू लागल्या.


भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनच्या वेळी वडिलांची सावली आणि आधार असलेली ही लेक दिसून आली. बाप आणि लेकीचा हा जिव्हाळा तेव्हा प्रत्येकाला भावूक करुन गेला. पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. यावेळी ते बूट घालण्यासाठी खाली वाकणार होते. वडिलांना खाली वाकून बूट घालण्यास त्रास होईल म्हणून सुप्रिया सुळे पुढे सरसावल्या आणि त्यांनी खाली बसून वडिलांच्या पायात बूट घातले.


सुप्रिया यांचं भाषेवरही तगड प्रभुत्व आहे. त्यांच्या भाषणाला मोठ्या संख्येने लोक जातात आणि प्रभावीत होतात. अगदी कोणाची मनधरणी असो किंवा पक्षातील नेत्यांशी संवाद असो त्या कायम पुढे राहिल्या आहेत. पक्षातील नेत्यांवर जेव्हा संकट आलं तेव्हा त्याचा पक्षासोबत आणि त्या नेत्यांच्या कुटुंबासोबत कायम खंबीरपणे उभा दिसतात.
