Suryakumar Yadav : वानखेडेच्या मैदानावर 'सूर्या' तळपला; सिक्स मारत ठोकली सेंच्युरी

Suryakumar Yadav : गुजरातविरूद्ध मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने तुफान शतक झळकावलं आहे. शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत त्याने सेंच्युरी पूर्ण केलीये.

May 12, 2023, 21:37 PM IST
1/6

वानखेडेच्या मैदानावर आज मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगलाय. 

2/6

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने तुफान शतक झळकावलं आहे. 

3/6

सूर्यकुमारने गुजरातविरूद्ध नाबाद 103 रन्सची खेळी केली आहे. 

4/6

यावेळी सूर्याने त्याच्या खेळीत 6 सिक्स आणि 11 फोर लगावले आहेत.

5/6

आयपीएलमध्ये सूर्यकुमारचं हे पहिलंच शतक आहे. 

6/6

सूर्याची तुफान खेळी पाहत कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्यासमोर हात जोडलेत.