महिना 2.25 लाख पगार.. 'या' देशानं बदलला किमान वेतनाचा नियम; राहतात केवळ 42000 भारतीय

Sweeden Salary New Rules: या देशामध्ये भारतीयांची संख्या केवळ 42 हजार इतकी आहे. या निर्णयाचा फायदा भारतीयांनाही होणार आहे. हा देश कोणता आहे आणि त्यांनी हा निर्णय नेमका का घेतला आहे जाणून घेऊयात. 

| Jul 15, 2024, 11:53 AM IST
1/8

work permit salary threshold

युरोपमधील सर्वात ऐश्वर्यसंपन्न देशांपैकी एक असलेल्या स्वीडनने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  

2/8

work permit salary threshold

नोकरी परवान्यासाठी आवश्यक असलेलं किमान वेतन 2 लाख 25 हजार रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय या युरोपीयन देशाने घेतला आहे.

3/8

work permit salary threshold

पूर्वीच्या तुलनेत ही वाढ 120 टक्के असून या माध्यमातून स्वीडनची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत असल्याचं अधोरेखित होत आहे.

4/8

work permit salary threshold

किमान वेतन वाढवण्याच्या माध्यमातून जगभरातील कौशल्यवान व्यक्तींना देशात आकर्षित करण्याचा स्वीडनचा मानस आहे. 

5/8

work permit salary threshold

स्वीडनच्या सरकारने जारी केलेला हा नवा नियम नव्याने या देशात कामासाठी जाणाऱ्या किंवा 18 जून 2024 नंतर कामगार परवाना रिन्यू करुन घेणाऱ्यांना लागू होणार आहे.  

6/8

work permit salary threshold

स्वीडनचं चलन स्वीडिश क्रोना हे आहे. एक स्वीडिश क्रोना म्हणजे भारतामधील 7.83 रुपये होता. म्हणजेच भारतातील सव्वा दोन लाख रुपये इतका किमान पगार स्वीडनमध्ये 28,719 स्वीडिश क्रोना होतात. (14 जुलैच्या चलनदरानुसार)

7/8

work permit salary threshold

स्वीडन हा देश भारतीयांना पर्यटनासाठी ठाऊक आहे. या देशामध्ये 42 हजारहून अधिक भारतीय वास्तव्यास आहेत.

8/8

work permit salary threshold

स्वीडनमधील भारतीय हे प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान श्रेत्रात काम करतात. स्वीडनमधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्याही बरीच आहे.