टाटाच्या या गाड्या मनावर राज्य करतील, सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार

टाटा कंपनीने पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली आहे.

| Apr 14, 2023, 14:53 PM IST

 टाटा मोटर्सने मार्च 2023 मध्ये 44,044 कार विकल्या आहेत. तर मार्च 2022 मध्ये विकल्या होत्या.

1/5

टाटा नेक्सॉन

टाटा नेक्सॉन

टाटा मोटर्सने मार्च 2023 मध्ये 44,044 कार विकल्यात. मार्च 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 42,293 युनिट्सपेक्षा 4 टक्के अधिक आहे. या काळात कंपनीची नेक्सॉन ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. Nexon ने मार्च 2023 मध्ये 14,769 युनिट्सची विक्री केली आहे, जी मागील वर्षीच्या (मार्च 2022) पेक्षा 3 टक्के अधिक आहे.

2/5

टाटा नेक्सॉन

टाटा नेक्सॉन

फेब्रुवारी 2023 मध्ये, कार उत्पादन केल्यानंतर 13,914 युनिट्सची विक्री झाली होती. टाटा नेक्सॉन ही एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. नेक्सॉनला ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. ही SUV पेट्रोल आणि डिझेल इंजिन व्हर्जन तसेच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.

3/5

टाटा पंच

टाटा पंच

टाटा पंचला मोठी लोकप्रियता मिळवली आहे. लॉन्च होऊन जवळपास दीड वर्ष झाले असले तरी आधीच टॉप-5 विकल्या जाणार्‍या SUV मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. एवढेच नाही तर सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-10 कारमध्ये टाटा पंचचाही समावेश आहे. मार्च 2023 मध्ये 10,894 युनिट्सची विक्री झाली, तर गेल्यावर्षी (2022) मार्चमध्ये 10,526 युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच, त्याची विक्री वार्षिक आधारावर सुमारे 3 टक्क्यांनी वाढली आहे. यात 1.2 लीटर NA पेट्रोल इंजिन आहे.

4/5

टाटा टियागो

टाटा टियागो ही कंपनीची तिसरी सर्वाधिक व्हॉल्यूम जनरेट करणारी कार आहे. गेल्या महिन्यात (मार्च 2023) या एंट्री-लेव्हल हॅचबॅक कारच्या 7,366 युनिट्सची विक्री झाली, तर गेल्यावर्षी (2022) मार्चमध्ये 4,002 युनिट्सची विक्री झाली. त्याची विक्री वार्षिक आधारावर 84 टक्क्यांनी वाढली आहे.  यामध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे.

5/5

टाटा नेक्सॉन

टाटा नेक्सॉन ही एक अतिशय लोकप्रिय एसयूव्ही आहे. नेक्सॉनला ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. ही SUV पेट्रोल आणि डिझेल इंजिन व्हर्जन तसेच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.