Tata Car Discount Offers: Tata च्या गाड्यांवर भरघोस डिस्काऊंट, कार खरेदीसाठी ग्राहकांचा झुंबड

Tata Car Discount Offers: जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. देशातील प्रसिद्ध ऑटोमोबाइल कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या अनने गाड्यांवर भरघोस डिस्काऊंट देत आहे. जर तुम्ही 2022 मध्ये निर्मिती करण्यात आलेली गाडी खरेदी केल्यास अजून फायदा होईल.   

Mar 09, 2023, 21:35 PM IST
1/5

Tata ने आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे, जर तुम्ही Harrier, Safari, Altroz, Tiago आणि Tigor यापैकी कोणतीही गाडी खरेदी केल्यास पैसे वाचणार आहेत. महत्वाचं म्हणजे, कंपनी अशा गाड्यांवर डिस्काऊंट देत आहे ज्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.   

2/5

टाटा सफारीच्या (Tata Safari) 2023 मॉडेलच्या सर्व व्हेरियंटवर 35 हजारांची सूट मिळत आहे. यामधील 10 हजार कॅश डिस्काऊंट तर 25 हजार रुपये एक्स्चेंज डिस्काऊंटवर आहेत. जर तुम्ही 2022 मध्ये आलेली Safari खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सर्व व्हेरियंटवर 65 हजारांपर्यंतची सूट मिळू शकते.   

3/5

Tata Harrier 2023 वरही 35 हजारांचा डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये 10 हजारांचा कॅश डिस्काऊंट आणि 25 हजारांचा एक्स्चेंज डिस्काऊंट आहे. तसंच MY2022 Harrier वर 65 हजारांपर्यतची सूट दिली जात आहे.   

4/5

Tata Tigor 2023 च्या पेट्रोल व्हेरियंटवर 25 हजार आणि CNG व्हेरियंटवर 30 हजारांची सूट मिळत आहे. जर तुम्ही 2022 मध्ये निर्मिती झालेली Tigor ची सीएनजी आणि पेट्रोल कार घेतल्यास 40 हजारांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.   

5/5

टाटाची प्रिमियम हॅचबॅक Tata Altroz च्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर 5 हजारांपर्यंत कमी किंमतीवर खरेदी करु शकता. ऑटोमॅटिक व्हेरियंटवर25 हजारांपर्यंतचा डिस्काऊंट मिळत आहे. तर Altroz च्या MY2022 च्या पेट्रोल व्हेरियंटवर 20 हजार आणि डिझेल व्हेरियंटवर 35 हाजारांची सूट दिली जात आहे.