राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला; टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक कोण?

Team India Next Coach:  राहुल द्रविडच्या जागी कोच म्हणून विरेंद्र सेहवाग आणि आशिष नेहरा हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

| Nov 20, 2023, 18:09 PM IST

Team India Next Coach: भारताचे एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. राहुल द्रविडच्या जागी टीम इंडियाचे प्रशिक्षक होण्यासाठी 4 मोठे दावेदार आहेत.

1/9

राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला; टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक कोण?

Team India Next Coach Virendra Sehwag Aashish Nehra Marathi News

Team India Next Coach: वर्ल्ड कप 2023 संपण्यासोबतच मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला आहे. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यासह भारताचे एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. राहुल द्रविडच्या जागी टीम इंडियाचे प्रशिक्षक होण्यासाठी 4 मोठे दावेदार आहेत.

2/9

आशिष नेहरा

Team India Next Coach Virendra Sehwag Aashish Nehra Marathi News

भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचे नाव आघाडीवर आहे. नेहरा हा एक चतुर क्रिकेट रणनीतीकार आहे. आशिष नेहराचा स्मार्टनेस टीम इंडियाला जगातील सर्वोत्तम संघ बनवू शकतो. आशिष नेहराने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे प्रशिक्षक बनून चुणूक दाखवून दिली आहे.

3/9

प्रबळ दावेदार

Team India Next Coach Virendra Sehwag Aashish Nehra Marathi News

आपल्या कोचिंगमध्ये त्याने या संघाला आयपीएल सीझन 2022 चे विजेतेपदही मिळवून दिले आहे. प्रोटोकॉलनुसार बीसीसीआयकडून नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागविण्यात येतील. टीम इंडियाचा पुढील प्रशिक्षक होण्यासाठी आशिष नेहरा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

4/9

स्टीफन फ्लेमिंग

Team India Next Coach Virendra Sehwag Aashish Nehra Marathi News

न्यूझीलंडचे दिग्गज स्टीफन फ्लेमिंग हे टीम इंडियाचे पुढील प्रशिक्षक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ते जगातील यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक असून त्यांच्या प्रशिक्षणाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. स्टीफन फ्लेमिंग यांच्या प्रशिक्षणाखाली, चेन्नई सुपर किंग्ज संघाने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

5/9

भारतीय खेळाडूंशी चांगले संबंध

Team India Next Coach Virendra Sehwag Aashish Nehra Marathi News

स्टीफन फ्लेमिंग यांचे भारतीय खेळाडूंशी चांगले संबंध आहेत. मोठ्या स्पर्धा कशा जिंकायच्या? हे स्टीफन फ्लेमिंगला माहीत आहे. त्यामुळे ते प्रशिक्षक बनून टीम इंडियाचे नशीब बदलू शकतात. 

6/9

टॉम मूडी

Team India Next Coach Virendra Sehwag Aashish Nehra Marathi News

ऑस्ट्रेलियन दिग्गज टॉम मूडी आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक आहेत. टॉम मूडी यांच्या प्रशिक्षणाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाने एकदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. टॉम मूडी यांच्या प्रशिक्षणाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाने 2016 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.

7/9

रवी शास्त्रींना टक्कर

Team India Next Coach Virendra Sehwag Aashish Nehra Marathi News

टॉम मूडी यांनी 2017 मध्ये टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी मुलाखत दिली होती. टॉम मूडी यांनी प्रशिक्षक निवड प्रक्रियेत रवी शास्त्रींना कडवी टक्कर दिली होती, पण विराट कोहलीची पसंती लक्षात घेऊन शास्त्री यांना प्रशिक्षक बनवण्यात आले. टॉम मूडी टीम इंडियाचे प्रशिक्षक होण्यासाठी मोठे दावेदार मानले जात आहे.

8/9

विरेंद्र सेहवाग

Team India Next Coach Virendra Sehwag Aashish Nehra Marathi News

टीम इंडियाचा माजी महान फलंदाज वीरेंद्र सेहवागही टीम इंडियाचा पुढील प्रशिक्षक होण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे. विरेंद्र सेहवागने आपल्या आक्रमक फलंदाजीने जगभरातील गोलंदाजांना सळो की पळो केले आहे. विरेंद्र सेहवाग टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक झाला तर तो टीम इंडियात आक्रमक विचार आणू शकतो.

9/9

यापूर्वीच केलाय अर्ज

Team India Next Coach Virendra Sehwag Aashish Nehra Marathi News

आपल्या आक्रमक कोचिंगमुळे विरेंद्र सेहवाग टीम इंडियाला तेच यश मिळवून देऊ शकतो जे न्यूझीलंडचा महान ब्रेंडन मॅक्युलम कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाला देत आहे. ब्रेंडन मॅक्क्युलमची आक्रमक कोचिंग शैली बेसबॉल म्हणून ओळखली जाते. सेहवागने यापूर्वीच टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला आहे.