SameerSharmaSuicide: समीरने या मालिकांमध्ये साकारली होती भूमिका; चित्रपटांमध्येही केलं होतं काम

टेलिव्हिजन अभिनेता समीर शर्माने त्याच्या मालाड येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. वयाच्या 44व्या वर्षी समीरने आपलं जीवन संपवलं.

Aug 06, 2020, 20:16 PM IST

दोन दिवसांपूर्वीच त्याने आत्महत्या केली असून, त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मालाड पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह तसापासाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या राहत्या घरातून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येतून सर्वजण सावरत नाही, तोच समीरची आत्महत्या आता कलाविश्वाला आणखी एक हादरा देऊन गेली आहे.

1/5

'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कहानी घर घर की', 'ये रिश्ते हैं प्यार के', 'लेफ्ट राइट लेफ्ट', 'ज्योति', 'गीत हुई सबसे पराई' या मालिकांमध्ये समीरने भूमिका साकारल्या होत्या.

2/5

त्याशिवाय 'दिल क्या चाहता है', 'वीरानगली', 'वो रहने वाली महलों की', 'आयुष्मान भव', 'इस प्यार को क्या नाम दूं', 'एक बार फिर', 'भूतू' या मालिकांमध्येही त्याने काम केलं होतं.

3/5

सध्या समीर 'ये रिश्ते हैं प्यार के' या मालिकेत शौर्या महेश्वरी हे पात्र साकारत होता.

4/5

टेलिव्हिजन शो व्यतिरिक्त समीरने चित्रपटांतही काम केलं होतं. समीरने 'हंसी तो फंसी' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्याशिवाय त्याने 'इत्तेफाक' या चित्रपटातही भूमिका साकारली होती. 

5/5

समीरने अनेक जाहिराती आणि मॉडलिंग असाइनमेंटमध्येही काम केलं होतं. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)