सुषमा स्वराज यांचे तुम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेले फोटो

Aug 07, 2019, 17:32 PM IST
1/10

सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोक व्यक्त केला जात आहे. ६७ वर्षीय सुषमा स्वराज यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राज्यसभेतही सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला. उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी सुषमा यांच्या निधनाचे शोकपत्र वाचले. त्यानंतर दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.+

2/10

सुषमा त्यांच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये एका हुशार विद्यार्थीनीशिवाय एनसीसी कॅडेटही होत्या. त्यांच्या नावे सर्वात कमी वयाच्या युवा मंत्री असण्याचा रिकॉर्डही आहे.

3/10

सुषमा यांचा विवाह स्वराज कौशल यांच्याशी झाला. स्वराज कौशल देशातील प्रसिद्ध वकील आहेत. चंडीगडमध्ये शिक्षण घेत असताना सुषमा यांची स्वराज कौशल यांच्याशी मैत्री झाली. वकीलीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघेही प्रक्टिससाठी दिल्लीत आले. इथे आल्यानंतर त्यांच्या मैत्राचं रुपांतर प्रेमात झालं.

4/10

सुषमा यांचे वडिल हरदेव शर्मा हे सुषमा आणि स्वराज यांच्या नात्याबद्दल नाखुश होते. पण हरदेव शर्मा त्यांच्या मुलीशी सुषमाशी अतिशय जवळ होते. त्यामुळे मुलीच्या प्रेमविवाहासाठी त्यांनी परवानगी दिली.

5/10

१३ जुलै १९७५ ला वरिष्ठ वकील स्वराज कौशल यांच्यासोबत सुषमा यांचा विवाह झाला. 

6/10

४० वर्षांच्या राजकीय करियरमध्ये सुषमा यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली.   

7/10

वयाच्या केवळ २५व्या वर्षी त्या हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या.

8/10

दिल्लीच्या पहिल्या महिल्या मुख्यमंत्रीही होत्या. 'डिजिटल डिप्लोमेसी' वकिली करणाऱ्या त्या पहिल्या मंत्री होत्या.  

9/10

सुषमा आणि स्वराज कौशल यांची मुलगी बांसुरी कौशल हिने ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीमधून पदवी आणि इनर टेम्प येथून कायद्याची बॅरिस्टर डिग्री घेतली आहे. 

10/10

सुषमा स्वराज यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील तेजोमय पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.