बहरला हिरवागार निसर्ग! भीमाशंकर येथील कोंढवळ धबधबा ओसांडून वाहतोय

डोंगरदऱ्यात वसलेला भीमंशकरचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथील धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. 

Sep 10, 2023, 23:35 PM IST

 kondhwal waterfall bhimashankar : भीमाशंकर परिसरातील कोंढवळ धबधबा ओसांडून वाहू लागलाय. या परिसरात सध्या दाट धुके आणि हिरवागार निसर्ग बहरलाय. पर्यटकांसाठी हा परिसर खास आकर्षण ठरत आहे.

1/8

श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकरच्या मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. भाविकांना कोंढवळ धबधबा आकर्षित करत आहे. 

2/8

कोंढवळ प्रचंड वेगाने प्रवाहित झाला आहे. 

3/8

कोंढवळ धबधब्या व्यतिरिक्त या ठिकाणी असणारे निसर्ग सौंदर्य व श्री क्षेत्र भीमाशंकर अभयारण्य पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.  

4/8

भीमाशंकर पासून हा धबधबा मात्र 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.  

5/8

पावसाळ्यात कोंढवळचा परिसर पर्यटकांना मोहिनी घालतोय.

6/8

या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे वरच्या मुखपासून ते खालच्या खोल दरीपर्यंत सुमारे 100 फूट उंच धबधब्याचे पाणी तीन टप्प्यांत पडते.

7/8

श्री क्षेत्र भीमाशंकरपासून सात किलोमीटरवर असलेल्या कोंढवळ परिसरातील हा सर्वात मोठा धबधबा आहे. 

8/8

भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगापैकी सहावे ज्योतीर्लिंग आहे. डोंगर दऱ्यात वसलेल्या या मंदिराचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भुरळ घालतोय.