Satpura Range : सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी समाजाचा सर्वात मोठा भोंगऱ्या बाजार
महाराष्ट्र, गुजरात मध्यप्रदेश या राज्यातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या भोंगऱ्या बाजारात सहभागी होतात. या अनोख्या बाजारात रोटी बेटी व्यवहार देखील होत असतो.
Culture of jalgaon : आदिवासी समाजाच्या सर्वात मोठया भोंगऱ्या बाजाराला सुरवात झाली असून आदिवासी पावरा बांधवांमध्ये उत्साह संचारला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी (Satpura Range) आदिवासी समाजाचा सर्वात मोठा भोंगऱ्या बाजार भरला आहे. भोंगऱ्या बाजार भरल्यानंतर होळीला सुरवात होत असते. या बाजाराला जुनी परंपरा असून 1980 साली या बाजाराला सुरवात झाली होती. जळगाव मधील चोपडा तालुक्यातील बडगाव येथून या बाजाराला सुरवात होते.