Mysterious Places: जगात आहेत 'ही' चार रहस्यमय ठिकाणे, जिथे लोक जायला घाबरतात; एक आहे भारतात

काही ठिकाणे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या रहस्यमय कथांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु यापैकी काही ठिकाणांना भेट देणे सामान्यांसाठी प्रतिबंधित आहे. 

| Nov 09, 2024, 15:15 PM IST

काही ठिकाणे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या रहस्यमय कथांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु यापैकी काही ठिकाणांना भेट देणे सामान्यांसाठी प्रतिबंधित आहे. 

1/5

जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी रहस्यमय आहेत आणि त्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. यापैकी काही ठिकाणे अशी आहेत जिथे जाण्यास मनाई आहे. चार ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.   

2/5

मेजा सेटे सिडेड्स, पुर्तगाल

पोर्तुगालच्या अझोरेस बेटांवर स्थित मेजा सेटे सिडेड्स,हे एक रहस्यमय ठिकाण आहे. असे म्हटले जाते की 16 व्या शतकात प्रोटेस्टंट धर्माचे अनुयायी या ठिकाणी लपले होते. आजही या ठिकाणी त्या शहरांचे अवशेष सापडतात. मात्र, या ठिकाणी भेट देण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते.   

3/5

उत्तर सेंटिनेल बेट, भारत

सेंटिनेलीज जमातीची लोक अंदमान आणि निकोबार बेटांवर स्थित उत्तर सेंटिनेल बेटावर राहतात. ही जमात बाहेरील जगापासून आजही पूर्णपणे अलिप्त राहते.   कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला त्यांच्या बेटावर येऊ देत नाही. भारत सरकारने या बेटावर जाण्यास बंदी घातली आहे.

4/5

स्नेक बेट, ब्राझील

स्नेक हे एक छोटे बेट ब्राझीलच्या किनाऱ्यापासून ३३ मैल अंतरावर आहे. या बेटावर जगातील सर्वात विषारी साप गोल्डन लान्सहेड हा आढळतो. या बेटावर सापांची संख्या इतकी जास्त आहे म्हणून याला स्नेक आयलंड म्हणून ओळखले जाते. इतके विषारी साप असल्याने ब्राझील सरकारने या बेटावर जाण्यास बंदी घातली आहे.

5/5

रशियाची मेट्रो-2

असे मानले जाते की मॉस्को, रशियामध्ये मेट्रो-2 नावाची एक गुप्त मेट्रो प्रणाली आहे. खूप महत्त्वाच्या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी या मेट्रो प्रणालीचा वापर त्याच्या सरकारकडून केला जातो. ही मेट्रो यंत्रणा सर्वसामान्यांसाठी बंद आहे.