शरीरातील 'हे' 5 बदल सांगतात की, तुम्हाला अन्न पचत नाहीये!

तुम्ही खात असलेल्या अन्नाचं योग्य पद्धतीने पचन होत नसेल तर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. यासाठीच अपचनाची लक्षणं जाणून घेतली पाहिजेत. 

Jul 31, 2023, 13:17 PM IST
1/5

जर तुम्ही खात असलेलं अन्न योग्य पद्धतीने पचत असेल तर संपूर्ण दिवस तुमच्या शरीरात उर्जा राहील. जर अन्नाचं नीट पचन होत नसेल तर तुम्ही सुस्त होऊ शकता.

2/5

अन्नाचे पचन नीट न झाल्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर समजा तुम्हाला अपचनाचा त्रास होतोय. 

3/5

जर तुमचं शरीर जड वाटत असेल तर तुम्हाला अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे.

4/5

अन्नाचे पचन न झाल्यामुळे तुम्हाला छाती आणि पोटात जळजळ होण्याची समस्या जाणवू शकते.

5/5

अपचनाची समस्या असेल तर तुम्हाला लगेच भूक लागत नाही.