Love Tips : क्रशबद्दलचं प्रेम व्यक्त करायचंय? मग 'या' टिप्स तुमच्यासाठीच...

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करुन तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता.

Jul 07, 2022, 23:09 PM IST

तुम्हाला कोणी पहिल्यांदाच आवडलं असेल किंवा कोणाला पाहिल्यानंतर वेगळीच फिलिंग आली असेल तर ते सांगणं थोडं कठीण वाटतंय?  तुम्हाला तुमच्या पहिल्या क्रशसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे? तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता हे त्याला सांगायचय पण ते कसं हे माहित नाही? या सर्वच प्रश्नांच उत्तर दडलयं आमच्या या टिप्समध्ये.

1/5

इमोजी पाठवा

आजकाल मजकूरापेक्षा इमोजी जास्त आहेत. तुम्ही मोबाईलवर तुमच्या भावना व्यक्त करणारे काही इमोजी पाठवू शकता.

2/5

प्रशंसा करा

तुम्ही करत असलेल्या चर्चेत तुमच्या क्रशची स्तुती करा, यामुळे त्याला किंवा तिला एक इशारा मिळेल आणि प्रकरण समोर जाईल.

3/5

मित्राद्वारे सांगा

जर तुम्हाला संकोच वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्राद्वारे तुमच्या भावना तुमच्या क्रशपर्यंत पोहोचवू शकता.  

4/5

आवडी-निवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करा

तुमच्या क्रशच्या आवडी-निवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचा क्रश तुम्हाला शक्य तितक्या चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याला किंवा तिला काय आवडते आणि काय नाही याची माहिती करुन घ्या.

5/5

सोबत वेळ घालवा

त्याच्या किंवा तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या क्रशला समजेल की तुम्हाला त्याच्या किंवा तिच्यासोबतच्या मैत्रीतून पुढं जायचं आहे.