IPL मधील टॉप 5 सिक्सर किंग

Aug 13, 2020, 09:04 AM IST
1/5

क्रिस गेल

क्रिस गेल

आपल्या स्फोटक खेळीसाठी जगभरात ओळखला जाणारा ख्रिस गेल आयपीएलच्या सिक्सर किंगच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. जेव्हा ख्रिस गेल आयपीएलमध्ये मैदानावर असतो तेव्हा त्याच्याकडून सिक्सचीच सर्वाधिक अपेक्षा असते. त्याने फक्त 125 सामन्यांमध्ये 326 सिक्स मारले आहेत.

2/5

एबी डिविलियर्स

एबी डिविलियर्स

अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्सने आपल्या अनोख्या खेळीने टी -20 क्रिकेटची व्याख्या बदलली आहे. क्रिकेटचा मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणारा एबी डिव्हिलियर्सकडे मैदानात चौकार आणि षटकार मारण्याचे उत्तम कौशल्य आहे. या कौशल्याच्या जोरावर डिव्हिलियर्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळलेल्या 154 सामन्यांमध्ये 212 सिक्स ठोकले आहेत.

3/5

महेंद्र सिंह धोनी

महेंद्र सिंह धोनी

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वादळी खेळ खेळतो. जेव्हापासून त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली तेव्हापासून धोनीला सिक्स मारण्याची आवड होती. आयपीएलमध्येही धोनीचा सिक्स पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर असतात. या लीगमध्ये धोनीने 190 सामन्यांमध्ये 209 सिक्स टोकले आहेत.  

4/5

रोहित शर्मा

रोहित शर्मा

शांत स्वभाव आणि आक्रमक खेळी या शैलीसाठी प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मालाही आयपीएलमधील पहिल्या सहा खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. क्रिकेटचे कोणतेही रूप असले तरी हिटमेन सीमा रेषेवर चुकत नाही. रोहित शर्माने 188 सामन्यांमध्य़े 194 सिक्स मारले आहेत.

5/5

सुरेश रैना

सुरेश रैना

डावखुरा फलंदाज सुरेश रैना हा आयपीएल किंग ही मानला जातो. रैना आयपीएलमध्ये फीट झाला आहे. रैनाने भारतातील सर्वात मोठ्या टी -20 लीगमध्ये 193 सामन्यांमध्ये 194 सिक्स ठोकले आहेत