close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विवेकला 'हा' अभिनेता आता कधीच माफ करणार नाही, नेटकऱ्यांचा दावा

ऐश्वर्या, सलमान आणि त्याच्या नात्याबद्दल करण्यात आलेले हे ट्विट त्याच्या अंगाशी आले आहे.

May 21, 2019, 20:23 PM IST

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉय त्याच्या 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे त्याच्या भूमिकेबद्दल चर्चा रंगत आहेत. तर दुसरीकडे त्याने केलेल्या एका ट्विटमुळे तो भलताच अडचणीत सापडला आहे. ऐश्वर्या, सलमान आणि त्याच्या नात्याबद्दल करण्यात आलेले हे ट्विट त्याच्या अंगाशी आले आहे. नेटकऱ्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

1/6

'माझ्या आयुष्यात मी कधी कोणत्या स्त्रीचा अनादर केला नाही, मागील १० वर्षांमध्ये मी एकूण २ हजार पेक्षा जास्त वंचित मुलींना सशक्त बनवण्यासाठी खर्च केला आहे.' असे वक्तव्य त्याने ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. 

2/6

कोणा एका महिलेचा अनादर करण्याचा विचारही मी करु शकत नाही', असे ट्विट त्याने केले. यासोबतच आणखी एक ट्विट करत त्याने माफी मागत ते वादग्रस्त ट्विट डिलीट केल्याचे स्पष्ट केले. 

3/6

हे प्रकरण नेटकऱ्यांनी मात्र फार मनावर घेतले आहे. एका युझरने 'सल्लूभाई ही गोष्ट कधीही मान्य करणार नाही...आता काही खरं नाही' असे ट्विट केले आहे.

4/6

विवेकने शेअर केलेल्या मीममध्ये सलमान आणि ऐश्वर्याचा फोटो असणाऱ्या भागावर 'ओपिनियन पोल' असे लिहिले होते.

5/6

अभिषेक बच्चनसोबतच्या तिच्या फोटोवर 'रिझल्ट्स' असे लिहिण्यात आले होते.

6/6

आता पुढे या प्रकरणात कोणतं वळण लागेल, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.