'माझी 8 कोटींची Rolls Royce 'बकवास'; Swift, Innova पेक्षा उत्तम गाडी नाही'

Rolls Royce Bakwas Innova Swift Are Best: आलिशान कार चालवणाऱ्या या गायकाला एका मुलाखतीमध्ये त्याच्याकडील कार कलेक्शनसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्याने केलेलं विधान ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नेमकं तो काय म्हणालाय पाहूयात...  

| Sep 14, 2024, 15:27 PM IST
1/9

 badshahcars

8 कोटींची आलिशान कार चालवण्याच्या अनुभवाबद्दल विचारलं असता प्रसिद्ध भारतीय गायकाने केलेलं विधान सध्या चर्चेत आहे.

2/9

 badshahcars

रॅप साँग म्हटल्यावर पैसा, तरुणी, महागड्या कार्स यासारखी दृष्य व्हिडीओमध्ये दिसणं सहाजिक गोष्ट आहे. मात्र खरोखरच रॅप गाणी गाणाऱ्यांना गाड्यांबद्दल विशेष आकर्षण असतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही.  

3/9

 badshahcars

भारतामध्येही असे अनेक प्रसिद्ध रॅप गायक आहेत ज्यांच्याकडे त्यांचा स्वत:चं आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. प्रसिद्ध गायक बादशाही याला अपवाद नाही.  

4/9

 badshahcars

आपल्या हटके गाण्यांमुळे मागील काही वर्षांपासून तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या बादशाहने नुकत्याच 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्याकडील आलिशान कार कलेक्शनसंदर्भात भाष्य केलं आहे.

5/9

 badshahcars

माझ्याकडे 8 कोटींची रोल्स रॉयस आहे, असं बादशाहने सांगितलं. मात्र त्याचवेळी आपल्याकडे जी ऑडी कार होती ती कंपनीने एका वर्षासाठी मार्केटींगचा भाग म्हणून दिलेली जी परत देण्यात आल्याचंही, बादशाहने स्पष्ट केलं.

6/9

 badshahcars

मात्र अनेक आलिशान गाड्या असल्या तरी दैनंदिन वापरासाठी 'स्विफ्ट' किंवा 'इनोव्हा'ला पर्याय नाही असंही बादशाह या मुलाखतीत म्हणाला आहे.   

7/9

 badshahcars

महागड्या गाड्या चालवायला मजा येते का? असा प्रश्न बादशाहला मुलाखतीत विचारण्यात आला.  

8/9

 badshahcars

त्यावर उत्तर देताना बादशाहने, "बकवास आहे. स्विफ्टहून उत्तम कोणतीच गाडी नाही. स्विफ्ट आणि इनोव्हापेक्षा उत्तम कोणतीही गाडी आजगायत तयार झालेली नाही," असं उत्तर दिलं. 

9/9

 badshahcars

याच मुलाखतीमध्ये बादशाहने त्याच्याकडे असलेल्या महागड्या गोष्टींमध्ये अनेक बुटांच्या जोडांचाही समावेश होतो असं आवर्जून सांगितलं. त्याच्याकडील एक जोड तर 22 लाखांचा असल्याचं त्याने सांगितलं.