Panchayat 3 , 'क्रु' ते 'स्वातंत्र्य वीर सावरकर' Weekend ला ओटीटीवर पाहा 'हे' चित्रपट आणि सीरिज

या आठवड्यात ओटीटीवर तुम्हाला घरी बसल्या काय काय पाहायचं असा प्रश्न पडला आहे का? त्यात कॉमेडी, अॅक्शन आणि इमोश्नल अशा अनेक गोष्टी असतात. मग आता ते शोधण्यात वेळ जाणार असं तुम्हाला वाटतं असेल तर या सगळ्यात या आठवड्यात ओटीटीवर कोणते शो आले आहेत ते आपण जाणून घेऊया...

| May 24, 2024, 15:04 PM IST
1/7

In Good Hands 2

या चित्रपटाची पटकथा ही अशा वडिल आणि मुलावर आहे जे एका अपघातानंतर भेटतात आणि एक नवी सुरुवात करतात. हा चित्रपट 23 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. 

2/7

क्रू

करीना कपूर खान, क्रिती सेनन आणि तब्बूचा 'क्रू' हा एक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाईकेली. तर हा चित्रपट आज 24 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

3/7

Jurassic World: Chaos Theory

अॅनिमेशन लव्हर्ससाठी हा एक खास चित्रपट आहे. क्रेटेशियस गॅंगचे मेंबर्स सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा एका नवं अॅडव्हेंचर करताना दिसणार आहे. हा चित्रपट आज 24 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. 

4/7

द बीच बॉईज (The Beach Boys)

ज्या लोकांना म्यूजिक आवडतं त्यांच्यासाठी असलेला हा चित्रपट आहे. खरंतर ही एक डॉक्युमेंट्री असून आज म्हणजे 24 मे रोजी ही डिज्नी प्लस हॉटस्टार प्रदर्शित झाली आहे.  

5/7

पंचायत 3

'पंचायत' या सीरिजचे आधीच्या 2 भागांनी प्रेक्षकांना वेड लावलं. आता या सीरिजचा 3 भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज 28 मे रोजी प्रदर्शित होणार असून प्राइम व्हिडीओवर तुम्ही पाहू शकतात.

6/7

स्वातंत्र्य वीर सावरकर

स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे. रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ज्यांना घरबसल्या पाहायची इच्छा आहे. त्यांना हा चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार आहे. हा चित्रपट 28 मे रोजी Zee5 वर प्रदर्शित होणार आहे. 

7/7

Die Hart 2: Die Harte

हा एक कॉमेडी अॅक्सन चित्रपट आहे. हा चित्रपट 30 मे रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.