IPL 2023 Photos: 31 मार्चपासून रंगणार आयपीएलचा थरार, पाहा एकूण किती सामने, किती डबल हेडर... जाणून घ्या सर्वकाही

IPL 2023 Photos: देशभरातील क्रिकेट चाहते ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहातात त्या आयपीएल (Indian Premier League) स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होत आहे. बीसीसीआयने (BCCI) आयपीएल 2023 चं संपूर्ण वेळापत्रक (IPL Schedule 2023) जाहीर केलं आहे. यंदा आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार असून हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स (GT) आणि एमएस धोणीच्या चेन्नई सुपर किंग्सदरम्यान (CSK) सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 28 पाहायला मिळणार आहे. 

Mar 21, 2023, 13:44 PM IST
1/6

आयपीएलचा हा सोळावा हंगाम असून 31 मार्च ते 28 मे दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत दहा संघांमध्ये एकूण 70 सामने रंगणार आहेत. तब्बल 52 दिवस ही स्पर्धा खेळवली जाईल. 21 तारखेपर्यंत ग्रुप स्टेजचे सामने होतील, त्यानंतर नॉकआऊट सामने खेळवले जातील.

2/6

यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 18 डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. डबल हेडर म्हणजे एका दिवसात दोन सामने. यातला पहिला सामना दुपारी 3.30 वाजता तर दुसरा सामना संध्याकाळू 7.30 खेळवला जाईल. 

3/6

आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स विजेता संघ ठरला होता. त्यांनी अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा आयपीएलचा पहिला सामना खेळण्याचा मान हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सला मिळणार आहे. तर राजस्थानचा संघ 2 एप्रिलला आपला पहिला सामना सनरायर्स हैदराबादबरोबर खेळेल.

4/6

यंदाच्या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ 14 सामने खेळेल, यातले 7 सामने घरच्या मैदानावर तर उर्वरीत 7 सामने विरोधी संघाच्या मैदानावर खेळेल.

5/6

यंदा दोन ग्रुप करण्यात आले आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येकी 5 संघांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रुप-ए: मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट राइडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स. ग्रुप-बी: चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनराइजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु, गुजरात टाइटन्स.

6/6

आईपीएल 2023 मध्ये एकूण 12 ठिकाणी सामने खेळले जातील. यात गुवाहाटी, धर्मशाला इथंही यंदा स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. याशिवाय अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदाराबाद, बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपुर, मुंबई या शहरांचा समावेश आहे.