वनडे सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारे 5 विकेटकीपर

Aug 03, 2020, 18:03 PM IST
1/5

कुमार संगकारा

कुमार संगकारा

श्रीलंकेचा महान विकेटकीपर कुमार संगकाराने त्याच्या करिअर दरम्यान अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. संगकाराने श्रीलंकेसाठी 397, आयसीसी वर्ल्ड इलेवनसाठी 4 सामने खेळले आहेत. तर एशिया इलेवनसाठी 3 सामने खेळले आहेत. संगकाराने एक विकेटकीपर म्हणून 482 विकेट घेतल्या आहे. ज्यामध्ये 99 स्टंपिंग आणि 383 कॅचचा समावेश आहे.

2/5

एडम गिलक्रिस्ट

एडम गिलक्रिस्ट

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपट एडम गिलक्रिस्ट जगातील एक उत्कृष्ठ विकेटकीपर मानला जातो. तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून 286 सामने खेळले आहेत तर आयसीसी वर्ल्ड इलेवनकडून एक सामना खेळला आहे. गिलक्रिस्टने 472 विकेट घेतल्या आहेत. ज्यामध्ये 55 स्टंपिंग आणि 417 कॅच आहेत. त्याच्या नावावर 6 वेळा 6 विकेट घेण्याचा रेकॉर्ड आहे.

3/5

महेंद्र सिंह धोनी

महेंद्र सिंह धोनी

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याची बॅटींग, त्याची कॅप्टन्सीसह उत्कृष्ठ विकेटकीपर म्हणून देखील ओळखला जातो. या यादीत धोनी तिसऱ्या स्थानावर आहे. भारताकडून धोनीने आतापर्यंत 347 तर एशिया इलेवनकडून 3 वनडे सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 444 विकेट घेतल्या आहे. ज्यापैकी 2007 मध्ये  इंग्लंडच्या विरुद्ध त्याने 6 विकेट घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

4/5

मार्क बाउचर

मार्क बाउचर

या यादीत आणखी एक नाव म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी विकेटकीपर मार्क बाऊचर याचं देखील आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 290 तर आफ्रिका इलेवनकडून 5 वनडे सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने एकूण 424 विकेट घेतले आहेत. ज्यामध्ये 22 स्टंपिंग आणि 402  कॅच घेतल्या आहेत. मार्क बाउचरने पाकिस्तानच्या विरुद्ध 2007 मध्ये 6 विकेट घेतल्या होत्या.

5/5

मोईन खान

मोईन खान

सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत मोईन खान पाचव्या स्थानावर आहे. त्याने 219 वनडे सामन्यांंमध्ये 287 विकेट्स घेतल्या आहेत. मोईन खानच्या या रेकॉर्डमध्ये 73 स्टंपिंग अणि 214 कॅच आहेत. त्याने 2000 साली ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध आणि 1995 मध्ये जिम्बाब्वेच्या विरुद्ध 5 विकेट घेण्याचा रेकॉर्ड बनवला होता.