Tulsi Manjiri Upay: तुळशी मंजिरीच्या उपायांनी देवी लक्ष्मीला करा प्रसन्न, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय

Tulsi Manjiri Upay: तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. ज्या घराच्या अंगणात तुळशी असते, तिथे लक्ष्मीचा वास असतो. नवीन वर्ष अनेक संकल्प केले असून प्रत्येकाला आपल्या घरात सुख, समृद्धी, सौभाग्य आणि ऐश्वर्य लाभावे असे वाटते. हिंदू धर्मशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यातील एक उपाय म्हणजे तुळशी मंजिरी. लक्ष्मी तर प्रसन्न होतेच पण भगवान विष्णूचा आशीर्वादही प्राप्त होतो. 

Dec 21, 2022, 17:32 PM IST
1/5

Tulsi Manjiri

घरामध्ये रोज भांडण होत असेल आणि कलहाचे वातावरण असेल तर एखाद्या शुभ दिवशी तुळशीचे पान तोडून गंगाजलात टाकावे आणि रोज सकाळी घरभर पाणी शिंपडावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. मांजिरीचे दाणे पायाखाली येणार नाहीत याची काळजी घ्यावी. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

2/5

Tulsi Manjiri

तुळशी मंजिरी लाल कपड्यात बांधून पैशाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे आर्थिक अडचण दूर होईल. मंजिरी लाल कपड्यात बांधण्यापूर्वी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण करा. 

3/5

Tulsi Manjiri

देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी मंजिरीचा उपाय कराल. नवीन वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी देवी लक्ष्मीला तुळशी मंजिरी अर्पण करा. यातून आर्थिक समस्या दूर होतील.

4/5

Tulsi Manjiri

सुखी वैवाहिक जीवनासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शिवलिंगावर मंजिरी अर्पण करा. गणपती आणि शिवाला तुळशी अर्पण केली जात नाही. पण मंजिरी अर्पण केल्याने फायदा होतो.

5/5

Tulsi Manjiri

तुळशीला जास्त मंजिरी येणं चांगलं मानली जात नाही. पौराणिक कथेनुसार अधिक मंजिरी येणे म्हणजे तुळशीला दुःख होते. म्हणूनच तुळशीची मंजिरी काढत राहावी.