धगधगत्या निखाऱ्यांवर चालता तर कुठे अंगावर सुया टोचतात; भारतातील अंगावर शहारे आणणाऱ्या विचित्र प्रथा

Unusual Festivals in India :  भारत हा विविध संस्कृतीने नेटलेला असून इथे वेगेवगळ्या राज्यात विविध सण साजरे करण्यात येतात. भारतातील काही सण आणि प्रथांबद्दल जाणून तुमच्या अंगावर शहारा येईल. कुठे धगधगत्या निखाऱ्यांवर चालता तर कुठे अंगावर सुया टोचतात, ऐकूनच तुम्हाला धक्का बसेल. 

Feb 16, 2024, 15:46 PM IST
1/7

वाघांचा खेळ - पुली काली - केरळ

केरळमध्ये ओणमच्या सणाचा एक भाग म्हणजे वाघांचा खेळ आहे. हा सण शेती आणि कापणीसाठी समर्पित असून 12 दिवसांचा हा उत्सव असतो. यात चौथा दिवशी वाघाप्रमाणे तयार होऊन कलाकार लोकनृत्य करतात. 

2/7

किल ऑर गेट किल्ड – बानी फेस्टिव्हल – आंध्र प्रदेश

आंध्रे प्रदेशात बानी फेस्टिव्हल साजरा करण्यात येतो. या उत्सवाता एकमेकांना लाठी मारण्याची परंपरा आहे. ही हिंसा नसून या उत्सवांचा अर्थ देवाला प्रेम आणि समर्पण व्यक्त करण्याची प्रथा आहे. मल्लेश्वर स्वामी आणि मलम्मा या देवांची विजयी मिरवणूक काढली जाते. त्यात हा लाठी मारण्याचा खेळ खेळला जातो. शरीर रक्तबंबाळ होतं पण कोणी हा खेळ खेळण्यापासून थांबत नाही. 

3/7

धगधगत्या निखाऱ्यांवर चालता - थिमिठी - तामिळनाडू

ही अघोरी प्रथा तामिळनाडूमध्ये आजही पाळली जाते. हा सणदेखील देवाला समर्पण असल्याने आजही तामिळनाडू उत्सवाने पाळली जाते. यामागील उद्देष्ट म्हणजे द्रौपदी यांना वाईट आत्म्यांपासून दूर ठेवण्यासाठी हे करण्यात येतं. देवीच्या या बलिदानाला जिवंत ठेवण्यासाठी पाळली जाते. 

4/7

पियर्सिंग बॉडीज - थाईपुसम - तामिळनाडू

थाईच्या तमिळ महिन्याच्या पौर्णिमेला हा तामिळनाडू आणि दक्षिण भारतात हा धक्कादायक आणि भीतीदायक उत्सव केला जातो. अंगावर सुया टोचतात, कान आणि नाक...शरीराला गरम सुया टोचल्या जातात. एवढंच नाही तर ट्रॅक्टर आणि इतर जड वस्तू  शरीराला लावल्या हुकने ओढण्याचा प्रयत्न केला जातो. 

5/7

शस्त्रांची पूजा – आयुधा पूजा – दक्षिण भारत

नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी दक्षिण भारतात शस्त्रांची पूजा केली जाते. धर्मशास्त्रात असा विश्वास आहे. देव हा आपल्या बाजूच्या सर्व गोष्टींमध्ये वास करतो. बंदूक, रायफल आणि तलवारी यासारख्या शस्त्रांवर विशेष पूजा केली जाते. सोबतच शक्तीदेवी, लक्ष्मी, पार्वतीची पूजा केली जाते. 

6/7

लहुआ घोंड - हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पिनी गाव पाच दिवसाच्या सणादरम्यान महिलांना वस्त्र परिधान करण्यावर मनाई असते. 

7/7

अग्नी केली, कर्नाटक

काटेल दुर्गा परमेश्वरीच्या मंदिरात आगीशी खेळलं जाते. इथे जीवाची पर्वा न करता आगीचे गोळे तळहाताने एकमेकांवर फेकले जातात.