पतीसाठी 1 कोटी रुपये खर्च करत पत्नीने शरीराचा 'हा' अवयव वाढवला, आता होतोय पश्चाताप... फोटो पाहून व्हाल हैराण

Model operations to lengthen her legs: पतीला आवडतं म्हणून एका महिलेने तब्बल एक कोटी रुपयांचा खर्च करत शरीराचा एका भाग वाढवून घेतला. यासाठी तीने अवघड शस्त्रक्रियाही करुन घेतली. पण आता या गोष्टीचा तिला पश्चाताप होतोय. या महिलेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

राजीव कासले | Sep 02, 2023, 16:39 PM IST
1/7

सोशल मीडियावर सध्या एका विचित्र प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. पतीला आवडतं म्हणून एका महिलने अवघड शस्त्रक्रिया करुन घेतली. तब्बल 1 कोटी 34 लाख रुपये खर्च करत या महिलेने आपल्या पायाची लांबी वाढवून घेतली. या महिलेचं नाव थेरेसिया फिशर असं आहे. 

2/7

पतीला लांब पायाच्या मुली आवडतात, म्हणून त्याने थेरेसियाला पायाची लांबी वाढवण्यास सांगितलं. पतीसाठी थेरेसियाने अवघड शस्त्रक्रिया करुन घेतली. पण आता या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. 

3/7

थेरेसिया फिशर ही जर्मनीतची नागरिक असून व्यावयासाने ती प्रसिद्ध मॉडेल आहे. ऑपरेशनआधी थेरेसियाची उंची 5 फूट 6 इंच इतकी होती. शस्त्रक्रियेनंतर थेरेसियाची उंची सहा फूट इतकी झाली आहे. 

4/7

थेरेसियाने पायात मेटल स्टिक टाकून पायांची लांबी साडेपाच इंच वाढवून घेतली. यासाठी तिला तब्बल 1 कोटी 34 लाख 24 हजार 384 रुपये इतका खर्च केला.

5/7

पायाची लांबी वाढवावी यासाठी पतीने जबरदस्ती केल्याचा आरोप थेरेसियाने केला आहे. पण पतीच्या दबावाला बळी पडत आपण शस्त्रक्रिया करायला नको हवी होती, आता या गोष्टीचा पश्चाताप होत असल्याचं थेरेसिया म्हणते

6/7

शस्त्रक्रियेनंतर पायाची लांबी वाढली, आणि गोष्टीमुळे मी समाधानी होते. पण सोशल मीडियावर लोकांच्या प्रचंड निगेटिव्ह कमेंटस येत असून यामुळे दु:ख झाल्याचं थेरेसियाने म्हटलं आहे. शस्त्रक्रियेनंतर थेरेसियाने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 

7/7

थेरेसियाने पतीला सोडचिठ्ठी दिली असून आता तिच्या आयुष्यात नवा बॉयफ्रेंड आला आहे. आपला आत्मविश्वास आता वाढल्याचं थेरेसियाने म्हटलं आहे. थेरेसिया सोशल मीडियावर लोकप्रिय असून इन्स्टाग्रामवर तिचे 1.46 हजार फॉलोअर्स आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x