Kiara कडे सर्वाधिक महागडं मंगळसुत्र, पण चर्चा मात्र 'या' अभिनेत्रींच्या सौभाग्याच्या लेण्याची

Most Expensive Mangalsutra Of Bollywood Divas: बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराईची लाट आली असं म्हणता येईल. सेलिब्रिटीज त्यांच्या लग्नात खूप पैसे खर्च करतात. लाखोंच्या आउटफिटपासून त्यांचे दागिन्यांची किंमत कर कोटींच्या घरात असते. बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या अंगठी पासून त्यांच्या मंगळसूत्रपासून सगळ्याच गोष्टींसाठी चर्चेत असतात. कियारा अडवाणी (Kiara Advani) पासून ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) प्रियांका चोप्राच्या (Priayank Chopra) मंगळसुत्राची किंमत माहितीये का? चला तर जाणून घेऊया त्यांच्या मंगळसुत्राची काय किंमत आहे.  

Feb 10, 2023, 12:21 PM IST
1/6

Kiara Advani and bollywood celebrity Mangalsutra

कियारा अडवाणी (Kiara Advani) : अभिनेत्री कियारा अडवाणी नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न बंधनात अडकली आहे. दरम्यान, 7 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकलेल्या कियाराचं मंगळसुत्र सध्या चर्चेत आलं आहे. तिच्या मंगळसुत्राची सर्वत्र चर्चा सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार कियाराच्या मंगळसुत्राची किंमत ही 2 कोटी आहे. 

2/6

Alia Bhatt and Ranbir Kapoor

Alia Bhatt and Ranbir Kapoor

आलिया भट्ट (Alia Bhatt) : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या वर्षी लग्न बंधनात अडकली असून रिपोर्ट्सनुसार तिच्या मंगळसुत्राची किंमत ही 40 ते 50 कोटी आहे. 

3/6

Katrina Kaif Mangalsutra

Katrina Kaif Mangalsutra

कतरिना कैफ (Katrina Kaif) : रिपोर्ट्सनुसार कतरिनाच्या मंगळसुत्राची किंमत ही 7 लाख रुपये होती. 

4/6

Deepika Padukone Mangalsutra

Deepika Padukone Mangalsutra

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं रणवीर सिंगशी लग्न केले. रिपोर्ट्सनुसार तिच्या मंगळसुत्राची किंमत ही 20 लाख रुपये होती. 

5/6

Priyanka Chopra Bachchan Mangalsutra

Priyanka Chopra Bachchan Mangalsutra

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) : रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्राच्या मंगळसुत्राची किंमत ही 52 लाख रुपये आहे. 

6/6

Aishwairya Rai Bachchan Mangalsutra

Aishwairya Rai Bachchan Mangalsutra

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) : रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं तिच्या लग्नात 45 लाख रुपयांचे मंगळसुत्र परिधान केलं होतं. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x