अरेरे! लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉकला निघणाऱ्यांना अशी शिक्षा...

Apr 23, 2020, 16:02 PM IST
1/6

अरेरे! लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉकला निघणाऱ्यांना अशी शिक्षा...

कोरोना विषाणू किंवा कोरोना व्हायरसनं गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. जवळपास सारं जग या क्षणाला लॉकडाऊनमध्ये आहे. भारतातही परिस्थिती काही वेगळी नाही. 

2/6

अरेरे! लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉकला निघणाऱ्यांना अशी शिक्षा...

असं असलं तरीही परिस्थितीचं गांभीर्य मात्र भारतात फारसं दिसून येत नसल्याची निराशाजनक बाब समोर येत आहे. 

3/6

अरेरे! लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉकला निघणाऱ्यांना अशी शिक्षा...

वारंवार इशारा देऊन, विनंती करुनही लॉकडाऊनच्या या काळात घरातून अनेक कारणांनी बाहेर पडणाऱ्यांचं प्रमाण काही केल्या थांबतच नाही आहे. मॉर्निंग वॉक किंवा आणखी कोणतं कारण, एकच गोष्ट समजून न गेता नागरिक सर्व नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. 

4/6

अरेरे! लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉकला निघणाऱ्यांना अशी शिक्षा...

अशाच नागरिकांना आता एका वेगळ्या मार्गाने शिक्षा केली जात आहे, ज्यामुळे खजील होण्यावाचून पर्यायच उरत नाही आहे.   

5/6

अरेरे! लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉकला निघणाऱ्यांना अशी शिक्षा...

मी अतिशहाणा..., मी सुशिक्षित तरीही सरकारच्या नियमांचं पालन करत नाही, मी, स्वार्थी आहे वगैरे अशा आशयाचे फलक धरुन मॉर्निंग वॉकला आलेल्या या अतिउत्साही मंडळींचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

6/6

अरेरे! लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉकला निघणाऱ्यांना अशी शिक्षा...

फक्त हे फोटोच नव्हे, तर आता लॉकडाऊनच्या काळात असं कोणीही नियमांचं उल्लंघन करताना दिसल्याय कुठे या मंडळींची आरती केली जात आहे, तर कुठे त्यांच्याकडून योगासनं करुन घेतली जात आहे. थोडक्यात काय तर, शिक्षेचा हा प्रभावी आणि अहिंसक बडगा फक्त आणि फक्त या बेजबाबदारांना वठणीवर आणण्यासाठी उभारला जात आहे.  (सर्व छायाचित्रे- सोशल मीडिया)