परदेशात फिरायचा प्लॅन करताय ? या पाच देशात भारतीयांना व्हिसाची गरज नाही

प्रत्येकाचं स्वप्नं असतं कधी ना कधी आपण परदेशात जाऊन फिरावं, पण तुम्हाला माहितेय का ? या जगात असे काही देश आहेत जिथे भारतीयांना व्हिसाशिवाय जाण्याची परवानगी आहे.  

Feb 21, 2024, 18:25 PM IST
1/9

परदेशात जाऊन फिरावं, मजा करावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. कधी आर्थिक समस्येमुळे तर कधी व्हिजा न मिळाल्याने परदेशात जाणं राहून जातं. असं असलं तरी काही असे देश आहेत, जिथे तुम्ही भारतीय असल्याचं ओळखपत्र दाखवलं तर तुम्हाला व्हिसा असण्याची गरज लागत नाही.   

2/9

मॉरीशस

जगभरातील स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून मॉरीशस देशातील समुद्रकिनाऱ्यांना ओळखले जाते. मॉरीशस देशाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.   

3/9

स्वच्छ समुद्रकिनारा, रिसॉर्ट, घनदाट जंगलं याचा पर्यटकांना आनंद घेता येतो. मॉरीशसमध्ये भारतीयांना 90 दिवस व्हिसाशिवाय फिरण्याची परवानगी आहे.  

4/9

मलेशिया

ट्वीन टॉवर हे मलेशियातील पर्यटनस्थळ म्हणूनओळखलं जातं. या देशात फिरण्यासाठी जास्त पैशांची गरज भासत नाही. त्यामुळेच पर्यटक कायमच या देशाला पसंती देतात.   

5/9

ईराण

ईराण हा ईस्लामिक देशांपैकी एक असून इथली संस्कृती आणि इतिहास जाणून घेण्यासाठी पर्यटक या देशाला भेट देतात. ईराणमध्ये भारतीयांना 15 दिवस व्हिसाशिवाय फिरण्याची परवानगी आहे.  

6/9

इंडोनेशिया

इंडोनेशिया म्हटलं की हमखास आठवतं ते बाली शहर. अनेक जगभरातील ट्रेकर्सना बालीचं घनदाट जंगल खुणावतं. इंडोनेशिया आणि भारताच्या संस्कृतीमध्ये बरचसं साम्य दिसून येतं. 

7/9

त्यामुळे इथे असणाऱ्या पुरातन मंदिरांना भेट देण्यास भारतीय  कायम पसंती दर्शवतात. जर तुम्हाला इंडोनेशियामध्ये फिरायचे असेल आणि तुम्ही जर भारतीय पासपोर्टधारक असाल तर तुम्हाला तिथे व्हिसा मिळतो. त्याद्वारे तुम्ही तिथे हमखास मजा करु शकता

8/9

थायलंड

प्रचीन बौद्ध स्तुप आणि बुद्धकालीन स्थापत्यकला पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक थायलंडला भेट देतात. थायलंडच्या संस्कृतीबरोबरच तिथे असलेला निळाशार स्वच्छ समुद्र अनेकांच्या मनात भरतो. त्याशिवाय नाइट लाइफ आणि शॉपिंग मार्केट हे पर्यटकांना आकर्षित करतं. थायलंडमध्ये भारतीयांना 15 दिवस व्हिसाशिवाय फिरण्याची परवानगी आहे.  

9/9

मालदिव

सध्या बरेच सेलिब्रिटी हे विकेंड हॉलिडे करता मालदिवला जाणं पसंत करतात. लक्ष्यद्विपपासून जवळ असलेल्या या  देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. इथे असलेले स्वच्छ समुद्रकिनारे हे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात.