50 MP कॅमेरा, 8 GB रॅम आणि बरचं काही... Vivo ने लाँच केला आजपर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन

Vivo T3x 5G या फोनचे बेस्ट फिचर्स जाणून घेवूया.

| Apr 17, 2024, 17:37 PM IST

Vivo T3x 5G Price in India : Vivo कंपनीने आजपर्यंतचा  सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. 15 हजारच्या बजेटफोनच्या रेंजमध्ये Vivo कंपनीने हा फोन लाँच केला आहे. Vivo T3x 5G असे या फोनचे नाव आहे. हा फोन oppo, xiaomi आणि samsung कंपनीच्या बजेट फोनला टक्कर देणार आहे.

1/7

Vivo T3x 5G हा फोन भारतील बाजारपेठेत लाँच झाला आहे. 

2/7

या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. यात 4GB रॅम + 128GB स्टोरेज मिळतो. 6GB रॅम + 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर, 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,499 रुपये इतकी आहे.   

3/7

 या फोनमध्ये 6000mAh क्षमतेही दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी  44W चार्जिंगला सपोर्ट करते. 

4/7

या फोनमध्ये 50MP प्राइमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यासह 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

5/7

  Vivo T3x 5G मध्ये 6.72-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. 

6/7

हा फोन  Android 14 OS वर काम करतो. या फोनमध्ये क्वालकॉम Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे.

7/7

Vivo T3x 5G हा फोन Vivo T2x  फोनचे अपडेटेड व्हर्जन आहे.