भारतीयांसाठी खुशखबर! बाजरपेठेत लवकरच लॉंच होणार या कंपनींच्या Electric Cars

मुंबई :  वाहन खरेदी करताना ग्राहकांचा कल इलेक्ट्रॉनिक बाईक, स्कूटर आणि कार्स खरेदीसाठी दिसून येतोय. छोट्या परिवारासाठी एकापेक्षा एक अशा  5 बेस्ट इलेक्ट्रिक कार्सबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया...   

Sep 13, 2022, 23:05 PM IST
1/5

Maruti WagaonR EV

Maruti Suzuki कंपनीची सर्वात जास्त विकलीजाणारी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या रुपात Maruti WagaonR EV ची लॉंच केली जाऊ शकेल. काही रिपोर्टनुसार, भारतात या कारची टेस्टिंग सुरु होऊ शकते. कदाचित या कारची भारतातील किंमत 10 लाख रुपयांपेक्षा (एक्स-शोरुम) कमी असू शकते.  

2/5

Mahindra eKUV100

बऱ्याच दिवसांपूर्वी Mahindra eKUV100 या कारची टेस्टिंग भारतामध्ये करण्यात आली. ही Electric Car लवकरच देशामध्ये ऑफिशिअली लॉंच केली जाईल अशी आशा आहे. या कारची रेंज 150 किमीपर्यंत असू शकते. याची किंमत 10 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होऊ शकते.

3/5

Citroen C3 Electric

Citroen कंपनी भारतामध्ये C3 हॅचबॅकचं इलेक्ट्रिक व्हर्जन लॉंच करण्याच्या तयारीत आहे. पुढच्या वर्षाीच्या एप्रिलमध्ये ही इलेक्ट्रिक कार लॉंच केली जाऊ शकते. एका सिंगल चार्जमध्ये या कारची रेंज 250 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. या कारची किंमत 10 ते 15 लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरुम) असू शकते.

4/5

Tata Tiago EV

Tata Motors कंपनीकडून Tiago EV ही इलेक्ट्रिक कार भारतात लवकरच लॉंच केली जाणार आहे. टाटा कंपनीकडून सर्वात छोटी आणि सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून भारतात लाँच केली जाऊ शकते. या कारची रेंज 300 किमीपर्यंत असू शकते. त्यासोबतच, या कारची किंमत 11 ते 12 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होऊ शकते.  

5/5

MG Mini EV

भारतामध्ये MG Motor कंपनीकडून लवकरच मिनी इलक्ट्रिक कार लाँच केली जाणार आहे. भारतामध्ये या कारची टेस्टिंग झाली आहे. या कारची साईज Maruti Alto पेक्षा देखील छोटी असू शकते. त्याचबरोबर, या कारची रेंज 150 किमीपर्यंत असू शकते. या कारची किंमत 10 ते 15 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरुम) खरेदी केली जाऊ शकते.