अजित पवार असं काय म्हणाले की भाजपाला द्यावं लागलं स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळ काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एनडीए सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा राजकारण तापलं आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याने आता भाजपाला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

Sep 25, 2023, 11:05 AM IST
1/8

अजित पवार यांचे वक्तव्य

DCM Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण किती काळ अर्थमंत्रीपदावर राहणार हे माहित नाही, असं म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

2/8

माझ्याकडे जबाबदारी राहील की नाही माहिती नाही

finance minister Ajit pawar

आज माझ्याकडे अर्थ मंत्रालय आहे, त्यामुळे तुम्हाला योजनांचा लाभ देणे हे माझे काम आहे. मात्र, ही जबाबदारी माझ्यावर किती काळ राहील, याबाबत काहीही सांगता येणार नाही, असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.

3/8

काय म्हणाले अजित पवार?

ajit pawar NCP

आपण मंत्रिमंडळात सामील झालो आहे. आपल्या संस्था मजबूत झाल्या पाहिजेत. त्या टिकल्या पाहिजेत. आज आपल्याकडे अर्थखातं आहे ते पुढे टिकेल ना टिकेल हे सांगता येत नाही, असे अजित पवार म्हणाले.

4/8

कुठे म्हणाले अजित पवार?

ajit pawar baramati

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी शनिवारी बारामतीत विविध संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थिती दर्शवली. यावेळी त्याने हे विधान केले आहे.

5/8

महायुतीत काय चाललं आहे?

What is going on in mahauti

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील युती सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात समन्वय नसल्याचे म्हटंल जात आहे

6/8

शरद पवार अजित पवार भेट

Sharad Pawar meets Ajit Pawar

दुसरीकडे अजित पवार यांनी गेल्या दोन महिन्यांत दोनदा शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्या गटातील इतर नेतेही शरद गटाच्या आमदारांच्या भेटीगाठी घेत असतात.

7/8

भाजपाने दिलं स्पष्टीकरण

BJP gave an explanation

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकणी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आणि अजित पवारांचे अर्थमंत्रालयातील वक्तव्य ही सामान्य बाब असल्याचे सांगितले.

8/8

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

chandrashekhar bawankule

भविष्यात काय होईल, हे कुणालाच माहीत नसतं. उद्या काय होईल? किंवा तुमचा-माझा उद्याचा दिवस कसा असेल? हे कुणालाच माहीत नसतं. त्यामुळे अजित पवारांचं विधान हे नैसर्गिक विधान आहे. ते राजकीय विधान नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.