Weather Update Maharashtra: 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, मुंबईतही उन्हाचा चटका वाढणार, तुमच्या भागातील स्थिती जाणून घ्या

Weather Update Maharashtra : मार्च महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आता एप्रिल महिना कसा असेल याची शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांना चिंता लागली आहे. राज्याच्या काही भागात सूर्य आग ओकणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

Apr 02, 2023, 09:11 AM IST

Weather Update Maharashtra in marathi : मार्च महिन्यात विदर्भ आणि मराठवड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं. गारपीटमुळे शेतातील पीक मातामोल झालं. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. एप्रिल महिन्यात राज्याला पुन्हा उष्णतेच्या तीव्र झळा सहन (heat wave) कराव्या लागणार आहेत.(Weather Update Maharashtra imd weather update temperatures heat wave risen in many districts of maharashtra Mumbai weather update in marathi)

1/6

'या' राज्यात उष्णतेची लाट

एप्रिल महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या पश्चिम भागात म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आलाय.   

2/6

विदर्भ, मराठवाड्यात काय स्थिती?

एप्रिल महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात सरासरी ते सरासरीहून अधिक पावसाची तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचीही शक्यात आहे. दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांचं तापमान हे 40 अंशापुढे गेल्यामुळं नागरिक त्रस्त आहेत.

3/6

कसा असेल एप्रिल महिना ?

यावर्षी एप्रिल ते जून या महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात तापमान सरासरीहून अधिक राहणार आहे. राज्याच्या काही भागांत उष्णतेच्या लाटा येण्याचा इशाराही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

4/6

मुंबईत कसं असेल हवामान?

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याचं तापमान हळूहळू वाढत आहे. वायव्य भारतातील काही भाग आणि द्वीपकल्पीय प्रदेश वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये एप्रिल ते जून या कालावधीत कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितलं आहे.

5/6

'या' ठिकाणी पावसाची शक्यता

नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.  

6/6

तीव्र उष्णतेची लाट येणार

एप्रिल महिन्यात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालचा दक्षिणेकडील भाग, उत्तर छत्तीसगड, गुजरात, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब हरियाना राज्यांत तीव्र उष्ण लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.